Saturday, 29 August 2015

Same sound but different spelling

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
---------•● English उच्चारसाधर्म्य शब्द •●--------

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ

=======================

Wednesday, 26 August 2015

Know what you are

जीवन का मूल्य :

गुरुनानक Saheb के पास एक आदमी
गया और उसने कहा बताईये गुरूजी
जीवन का मूल्य क्या है?

गुरूनानक ने उसे एक Stone दिया
और कहा , जा और इस stone का
मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान
रखना stone को बेचना नही है I

वह आदमी stone को बाजार मे एक
संतरे वाले के पास लेकर गया और
संतरे वाले को दिखाया l
बोला "बता , इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले stone को देख
कर बोला, "12 संतरे लेजा और इसे
मुझे दे जा"

वह आदमी संतरे वाले से बोला गुरू
ने कहा है इसे बेचना नही है l

और

आगे एक सब्जी वाले के पास गया,
उसे stone दिखाया l सब्जी वाले ने
उस चमकीले stone को देखा और
कहा "एक बोरी आलू ले जा और
इस stone को मेरे पास छोड़ जा"

उस आदमी ने कहा , मुझे इसे बेचना
नही है , मेरे गुरू ने मना किया है I

आगे एक सोना बेचने वाले सुनार के
पास गया उसे stone दिखाया सुनार
उस चमकीले stone को देखकर बोला
"50 लाख मे बेच दे" l उसने मना कर
दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे
या बता इसकी कीमत जो माँगेगा वह
दूँगा तुझे

उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू
ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास
गया उसे stone दिखाया l जौहरी ने जब
उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले
उसने रुबी के पास एक लाल कपडा
बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की
परिक्रमा लगाई माथा टेका l फिर जौहरी
बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती
रुबी

"सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर
भी इसकी कीमत नही लगाई जा सकती
ये तो बेसकीमती है l"

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे गुरू
के पास आया l अपनी आप बिती बताई
और बोला
"अब बताओ गुरूजी मानवीय जीवन का
मूल्य क्या है?

गुरूनानक बोले :
तूने पहले stone को संतरे वाले को
दिखाया उसने इसकी कीमत
"12 संतरे" की बताई l

आगे सब्जी वाले के पास गया उसने
इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l

आगे सुनार ने "2 करोड़" बताई l

और

जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l

अब ऐसे ही तेरा मानवीय मूल्य है lतू बेशक हीरा है लेकिन सामने वाला तेरा आकलन अपनी औकात अपनी जानकारी और अपनी हैसियत और मकसद से लगाएगा। घबराओ मत दुनिया में तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,

You are also Unique,

No One Can Replace You.

Saturday, 15 August 2015

Food for thought

�� खोट वाटले  तर माफ करा...

आपण अशा देशात रहातो..
जिथे
पोलीसाला बघून सुरक्षित वाटण्याच्या जागी जास्त भयभीत होतो...

खोट  वाटले  तर माफ करा...

आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च करतो...
त्याहून जास्त तिच्या लग्नात करतो...

खोट वाटले तर माफ करा...

भारतीय लोक शर्मिले असून सुध्धा
आपली लोकसंख्या 121 कोटी आहे...

खोट वाटले  तर माफ करा...

मोबाईल वर स्क्रेचेस् न पडण्यासाठी त्यावर स्क्रिन गार्ड लावतो
पण
मुलगा मोटरसायकलवर निघताना त्याला हेल्मेट घालत नाही...

खोट   वाटले  तर माफ करा...

सन्नी लीओन, पूनम पांडे ईत्यादी ईथे सेलिब्रीटी होवून जातात...
पण
...परित्यक्ता, विधवा स्त्री समाज स्वीकारत नाही...

खोट वाटले  तर माफ करा...

बेकार चित्रपटाची सिल्वर जूबिली साजरी होते...
पण
प्रेरणादायी पुस्तके विकली जात नाही...

खोट वाटले तर माफ करा...

ईथे प्रत्येकाला घाई आहे
तरीही
वेळेवर कोणीच का पोहचत नाही...

खोट वाटले  तर माफ करा...

असली मेरी कोम पेक्षा...
सिनेमात मेरी कोम चा रोल भजवणार्या प्रियांकाला जास्त पैसे मिळतात...

खोट वाटले तर माफ करा...

गीता आणी कुराण च्या नावावर भांडणे करणार्यांनी
ह्या ग्रंथाचे मूळात वाचन केलेलेच नसते...

खोट  वाटले  तर माफ करा...

ईथे चप्पला वातानुकूलित दुकानात
आणी
भाजीपाला फूटपाथ वर विकला जातो...

खोट वाटले  तर माफ करा...

देशासाठी जीवन समर्पित करणार्या सैनिकाच्या परिवाराला दोन लाख
आणी
क्रिकेट खेळणार्यास दोन करोड रुपये दिले जातात...

खोट वाटले  तर माफ करा...

सगळ्यात महत्वाचे...
या सगळ्या गोष्टी पटतात...
पण
मनात आलेला बदलाव 3 ते 4 मिनिटा पेक्षा जास्त टिकतच नाही...

कारण माझा भारत महान...
आणी
आम्ही भारतीय त्याहून अधिक महान...

खोट वाटले  तर माफ करा...
����������������

Wednesday, 12 August 2015

Try this

केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??

कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ

एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!

विलोमपदे palindrome

��
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.  लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१)  चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे.
ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)

१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा

आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?

उलट-सुलट दोन्ही कडून वाचा
१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
��

All that glitter is gold

Interesting stats ::

1950 to 2014 Gold Price for 10 grams. Chart in India

Year Rate(In INR)
1950 Rs.99
1951 Rs.98
1952 Rs.76
1953 Rs.73
1954 Rs.77
1955 Rs.79
1956 Rs.90
1957 Rs.90
1958 Rs.95
1959 Rs.102
1960 Rs.111
1961 Rs.119
1962 Rs.119
1963 Rs.97
1964 Rs.63
1965 Rs.71
1966 Rs.83
1967 Rs.102
1968 Rs.162
1969 Rs.176
1970 Rs.184
1971 Rs.193
1972 Rs.202
1973 Rs.243
1974 Rs.369
1975 Rs.520
1976 Rs.545
1977 Rs.486
1978 Rs.685
1979 Rs.890
1980 Rs.1300
1981 Rs.1800
1982 Rs.1600
1983 Rs.1800
1984 Rs.1900
1985 Rs.2000
1986 Rs.2100
1987 Rs.2500
1988 Rs.3000
1989 Rs.3100
1990 Rs.3200
1991 Rs.3400
1992 Rs.4300
1993 Rs.4100
1994 Rs.4500
1995 Rs.4650
1996 Rs.5100
1997 Rs.4700
1998 Rs.4000
1999 Rs.4200
2000 Rs.4400
2001 Rs.4300
2002 Rs.5000
2003 Rs.5700
2004 Rs.5800
2005 Rs.7000
2006 Rs.9000
2007 Rs.10800
2008 Rs.12500
2009 Rs.14500
2010 Rs.18000
2011 Rs.25000
2012 Rs.32000
2013 Rs.33000
2014 Rs.30000
2015 Rs.27000
22 जुलै 2015 Rs 25600
..या गोष्टी पाहूनच सोने खरेदी करा

पिंपरी - सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरातील घसरण कायम असून, गेल्या पाच वर्षातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. बाजारातील एकंदर स्थिती लक्षात घेता सोन्याचे भाव प्रतितोळा २३ हजारापर्यंत खाली उतरतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तसं झाल्यास सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच चालून येणार आहे. मात्र सोने खरेदी करताना काही गोष्टींची आपण माहिती करून घेतली पाहिजे. खालील गोष्टी पाळल्यास फसवले जाण्याचा धोका टळेल.

24 कॅरेट गोल्डपासून तयार होत नाही दागिने

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.

हॉलमार्क नंबरवर शुद्धता 

सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.

शुद्धतेनुसार असतात कॅरेट

24 कॅरेट- 99.9

23 कॅरेट--95.8

22 कॅरेट--91.6

21 कॅरेट--87.5

18 कॅरेट--75.0

17 कॅरेट--70.8

14 कॅरेट--58.5

9 कॅरेट--37.5

अशी ठरवली जाते सोन्याची किंमत

1) कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा.

(22/24)x100 = 91.66 म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 25 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (25000/24)x22= 22916 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.

2. 18 कॅरेट सोन्याची किंमत (25000/24)x18 =18750 रुपये प्रति तोळा येते. ऑफरमध्ये शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात.

अशी केली जाते सोन्यात भेसळ

1. निकेल आणि प्लॅटिनम यांचा वापर

तुम्ही व्हाईट गोल्ड दागिने खरेदी करीत असाल तर प्लॅटिनम मिक्स ऐवजी पॅलेडियम मिक्स दागिने विकत घ्या.

2. केडीएम आणि तांब्याची भेसळ

केडीएम मार्क सोने शुद्ध असल्याचे सांगूनही विकले जाते. केडीएम मार्क म्हणजे आपण जे दागिने विकत घेत आहोत त्यात केडियम मिक्स आहे. सोन्यात तांब्याचीही भेसळ केली जाते. त्यामुळे दागिने किंवा सोन्याची कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी नंबर किंवा मार्क जरुर तपासून घ्या. वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातीत 24 कॅरेट सोन्याचे दागिने असे सांगितले जाते. पण ते खरे नसते. तुम्ही विकत घेताना 22 किंवा 23 कॅरेटचे दागिने घेता. म्हणजेच प्रसाद माध्यमांमध्ये दाखविलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला ते विकत घ्यायला हवेत.

असे ओळखा खरे हॉलमार्क

हॉलमार्क शुद्धतेची गॅरेंटी आहे. हॉलमार्कचे निर्धारण भारताची एकमेव एजेंसी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआईएस) करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी ही संस्था त्यांची तपासणी करते. त्यानुसार त्यावर हॉलमार्क दिला जातो. पण काही ज्वेलर्स दागिन्यांची तपासणी करण्यापूर्वीच हॉलमार्क लावतात. अशा वेळी हॉलमार्क साईन खरे आहे का, हे बघणे अतिशय आवश्यक आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी साईन असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही लिहिली असते. त्यात ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकतेचा लोगो असतो.

सोने विकत घेताना हे करा

प्योरिटी प्रमाणपत्र घेणे विसरु नका

सोने खरेदी करताना ऑथेंटिसिटी/प्योरिटी सर्टिफिकेट घेणे विसरु नका. सोन्याची कॅरेट क्वालिटी चेक करा. दागिन्यात लागलेल्या जेम्ससाठी वेगळे प्रमाणपत्र घ्या.

आवाजावर लक्ष द्या

सोन्याचे शिक्के विकत घेत असाल तर त्यांचा एकमेकांवर धडकल्याचा विशिष्ट असा आवाज होतो. एखाद्या मेटलवर सोन्याचे नाणे पडले तर जड आवाज येतो. बनावट नाणे असेल तर त्यातून लोखंडासारखा आवाज येईल.

पक्के बिल घ्या

कोणत्याही दुकानातून सोने विकत घेताना पक्के बिल तयार करुन घ्या. त्यात किती कॅरेटचे सोने आहे, बाजारभाव कोणता घेतला आहे, मजुरी किती लावली आहे याची तपासणी करा.

Tuesday, 4 August 2015

Vedik

Sharing a beautiful piece, received today. Do read and reflect:

������
��VEDIC WISDOM��

What is fear.....��?
Unacceptance of uncertainty.
If we accept that uncertainty,
it becomes adventure...!

What is envy ��?
Unacceptance of good in others
If we accept that good, it becomes inspiration...!

What is Anger��?
Unacceptance of things which are beyond our control.
If we accept, it becomes tolerance...!

What is hatred��?
Unacceptance of person as he is.
If we accept person unconditionally, it becomes love...!

It's a matter of acceptance.

Resistance creates stress... 
Acceptance does away with stress ...! ����

������

Saturday, 1 August 2015

Joke

गवर्नमेंट का ब्रिज का टेंडर निकला.
.
एक मद्रासी ने 3 करोड़ ,का कोटेशन दिया.
.
अथॉरिटीज ने पूछा : "कैसे ?"
.
मद्रासी ने कहा :
"2 करोड़ का मटेरियल
70 लाख का लेबर
30 लाख मेरा मुनाफा"
.
मालवणी ने 9 करोड़ का कोटेशन दिया.
.
अथॉरिटीज ने पूछा :
"इतना महँगा कैसे ?"
.मालवणी बोला :
"3 करोड़ आपके
और
3 करोड़ मेरे"
.
अथॉरिटीज ने पूछा :
"और ब्रिज का क्या ?"

मालवणी बोला :
"ब्रिज मद्रासी बनाएगा."
.
मालवणी को टेंडर मिल गया !

आले शंभर...गेले शंभर .......आपले मालवणी १नं.
����������

Lokmanya tilak death anniversary

एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!

ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.

संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.

स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो

मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड" पाशी येऊन थांबलाय
तिथं देशद्रोह्याना मिळणार्‍या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत
कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत, कुठल्याच द्रौपदीपर्यंत
टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला
डरकाळ्या फोडणार्‍या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.

तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे दिवसेदिवस
प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत

इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप
सारंच परकं होईल त्यांना
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय

एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!