Wednesday 30 December 2015

प्रेम म्हणजे प्रेम असत

प्रेम म्हणजे प्रेम असत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !
कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
कवी - मंगेश पाडगावकर

Have some challenges. Stay fresh

Worth reading...this fish story

The Japanese have always loved fresh fish�� ������

But the water close to Japan has not held many fish���� for decades.

So to feed the Japanese population, fishing boats got bigger and went farther than ever.

The further the fishermen went, the longer it took to bring the fish��������

If the return trip took more time, the fish �������� were not fresh.

To solve this problem, fish ���� companies installed freezers on their boats.

They would catch the fish ���� and freeze them at sea.

Freezers allowed the boats to go farther and stay longer.

However, the Japanese could taste the difference between fresh and frozen fish���� and they did not like the taste of frozen fish ����

The frozen fish���� brought a lower price.

So, fishing companies installed fish tanks.

They would catch the fish ���� and stuff them in the tanks, fin to fin.

After a little thrashing around, they were tired, dull, and lost their fresh-fish taste.

The fishing industry faced an impending crisis!

But today, they get fresh-tasting fish to Japan.

How did they manage...?

To keep the fish������ tasting fresh, the Japanese fishing companies still put the fish������ in the tanks but with a small shark����

The fish������are challenged and hence are constantly on the move.

The challenge they face keeps them alive and fresh!

Have you realized that some of us are also living in a pond but most of the time tired and dull....?

Basically in our lives, sharks ���� are new challenges to keep us active.

If you are steadily conquering
challenges, you are happy.

Your challenges keep you energized.

Don’t create Success and revel in it in a state of inertia.

You have the resources, skills and abilities to make a difference. 

Put a shark ���� in your tank in the year 2016 and see how far you can really go....

चारित्र्य आणि personality

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व
_______ डॉ.संजय ओक

माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा... काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी.

‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला.

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो.

‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे!

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत... दोन बालपणांत.

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले.

पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता?

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते.

चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो.

चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते.

चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ.

चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते.

चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते.

व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो.

थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते.

चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी?

उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही.

व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे.

त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला.

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’

शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.

साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव.

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

Saturday 26 December 2015

Start your own business

नोकरीला वैतागलात?
?
?
.
.

.

.

.

.

.

आता हे करून बघा

.

.

.















फक्त काही व्यवसायांची यादी

.
.
.


1.कृषी सल्ला व सेवा  केंद्र
2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
3. फळ रसवंती गृह
4. कच-यापासून बगीचा
5. आय. क्यू. एफ. प्रकल्प
6. एम.सी.आर. टाईल्स
7. पी.व्ही.सी. केबल
8. चहा स्टॉल
9. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी  पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे व गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार व माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण 
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी
88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान व कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल व भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग 
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. रबर
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा 
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
_______________________________

       मला खात्री आहे यातल एकही काम तुम्हाला जमणार नाही.
इतकेच कशाला तुम्ही वरची संपूर्ण यादी वाचण्याचे कष्ट ही घेतले नसणार.

मुकाट्याने आपापली नोकरी करा. त्याच्या इतकं सोपं काम जगात नाही
����������������

Marathi books for free

http://www.esahity.com

या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
सगळं फ़्री आणि ईझी.
बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books  उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.  ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिक करा. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.

Saturday 19 December 2015

Jokes on students and teachers

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
����������������������
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?

.
.
.

.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.��������

मास्तरांनी ��कोरड्या विहिरीत उडी मारली....
������������������

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
��������

पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
����

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

��������������

आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

��������
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........




बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
��������������
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
���� ��
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का


मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." ��

����������������

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ����������������
वडापाव चा गाडा चालवतायत

Friday 18 December 2015

Signature tips

"स्वाक्षरी"
म्हणजे सहीबद्दल थोडी माहिती :

१) जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात.

२) जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात.

३) काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात.
त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणाचंही नुकसान करु शकतात.

४) जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात.

५) काही लोक सहीच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात. खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आकडता असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो.

६) जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो.

७) ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात.

८) ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मध्येच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याहीब कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते.

९) काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात. अशा व्यक्ती संतुलित असतात. समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात.

१०) जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहीताना खालून वर घेऊन जातात ते लोक आशावादी असतात. निराशा ही त्यांच्या स्वभावातच नसते. अशा लोकांचा देवावर अधिक विश्वास असतो. या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगलं प्रतिनिधीत्व करू शकतात.....!!!
या माहितीत बऱ्यापैकी तथ्य आढळेल !

����
आपल्या सहीशी पडताळणी केल्यावर थोडीजरी  सत्यता वाटली तर दुसऱ्या ग्रुपवर पाठविण्यास हरकत नाही