आजकाल आपण सर्वजण मेमरी कार्ड वापरतो. आपल्याला हवे असलेल्या GB चे मेमरी कार्ड जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा त्याच्या किमती मध्ये बरीच तफावत आढळते. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात.
मेमरी कार्ड घेतल्यानंतर असे कधी जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नव कोर कार्ड खूप स्लो आहे.?
फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो?
असे जाणवले तर त्याला एक गोष्ट कारणीभूत असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. प्रत्येक मेमरी कार्ड वर त्याचा क्लास लिहिलेला असतो पण आपल्याला याची माहितीच नसते.अर्थात मला हि नव्हती आणि आजच हि गोष्ट मला समजली म्हणून तुमच्याशी शेअर करीत आहे.
आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?
तुमचे मेमोरी कार्ड बाहेर कडून जरा नीट पहा. त्यवर काहीतरी लिहिलेले दिसेल.
प्रत्येक मेमरी कार्ड चा क्लास असतो. हा क्लास ठरवतो कि तुमच्या कार्ड च स्पीड ठरवत असतो .जितका मोठा क्लास तेवढा तुमच्या कार्ड चा स्पीड जास्त असतो .मेमरी कार्ड चे क्लास , क्लास २ , क्लास ४, क्लास ६,क्लास १० असे आहेत.
स्वस्त मिळणारी मेमरी कार्ड हि क्लास २ ची असतात. त्यमुळे ती स्वस्त देखील मिळतात.
तुमच्या गरजे नुसार कोणते कार्ड घ्यायचे हे तुम्ही ठरवू शकता. साधारणपणे जर तुम्ही साधा मोबाइल वापरत असाल तर क्लास २ पुरेसे आहे.पण जर तुम्ही HD व्हिडीवो शूट करत असाल तर “क्लास १०” कार्ड तुमच्यासाठी चांगले असेल
मेमरी कार्ड चा क्लास कसा पहायचा ?
फोटोमध्ये पहा....पिवळ्या गोलमध्ये ४ आणि 10 हे अंक "C" मध्ये लिहिलेले दिसतात, ते नंबर म्हणजे त्या कार्ड चा क्लास असतो.
आता कदाचित तुम्हाला समजले असेल कि काही मेमोरी कार्ड स्वस्त आणि काही मेमरी कार्ड महाग का असतात.
मेमरी कार्ड खरेदी करताना त्याचा क्लास मात्र आठवणीने पहा.
Friday, 9 October 2015
While having memory card
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment