" आरती ऐडमिन देवाची "
---------------
जय देव जय देव
जय ऐडमिन देवा
तुझा महिमा आम्ही
किती रे गावा ....|| धृ ||
विखुरलेले दोस्त एकत्र केले
नात्या गोत्या मधे रंग तू भरले
मैसेज वाचून मी पण सरले
मान अपमान काही न उरले
सदैव मिळो खुशालीचा मेवा
जय देव जय देव
जय ऐडमिन देवा
तुझा महिमा आम्ही
किती रे गावा ....||1||
तुझ्यामुळे आज संवाद होतो
कार्य प्रसंगी शुभेच्छा देतो
सुख दुःखात धाउन जातो
एकमेकाचे कौतुक करतो
माणूसकिचा पाट असाच वाहावा
जय देव जय देव
जय ऐडमिन देवा
तुझा महिमा आम्ही
किती रे गावा ....||2||
राजा हा ग्रुप असाच ठेव
सर्वांना प्रेमाने बांधून ठेव
असाच राहो माणसांचा गाव
सर्वांच्या सोबत कशाचे भेव
बोलावे ,हसावे,लळा लावावा
जय देव जय देव
जय ऐडमिन देवा
तुझा महिमा आम्ही
किती रे गावा ....|| 3 ||
No comments:
Post a Comment