Tuesday, 3 March 2015

New idioms

आधुनीक वाक्प्रचार
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!!
2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!
3) खिशात नाही डोनेशन,घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!
4) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!!!
5) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!
6) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!!!!
7 ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!
8) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!
9) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!
10) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!
11) जागा लहान फ़र्निचर महान !!!!!
12) उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!
13) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!
14) काटकसर करुन जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं...!!
आधुनिक म्हणी!
१. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा
२. ज्याची खावी पोळी,त्यालाच घालावी गोळी
३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण
४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी
५. चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला
६. आपले ते पक्षांतर, दुसर्याचा तो फुटीरपणा
७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे
8. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा
९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण
१०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो
११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना
१२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला
१३. वयही गेले, पैसेही गेले,हाती राहीले दाखले
१४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे
१५. साहेबापुढे वाचली गीता,कालचा मेमो बरा होता
१६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता
१७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार
१८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका
१९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला
२०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
२१. पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये
२२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही
२३. नाव गंगूबाई,आंघोळीला पाणी नाही
२४. घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा
२५. घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल
२६. घाईत घाई त्यात चष्मा नाही
२७. रिकामा माळी ढेकळ फोडी
२८. घरोघरी मॉडर्न पोरी
२९. ओठापेक्षा लिपस्टीक जड
३०. नाकापेक्षा चष्मा जड
३१. अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार
३२. बायकोची धाव माहेरापर्यंत
३३. गोष्ट एक चित्रपट अनेक
३४. काम कमी फाईली फार
३५. लाच घे पण जाच आवर
३६. मंत्र्याच पोर गावाला घोर
३७. मरावे परी मूर्तिरुपे उरावे
३८. नटीच्या लग्नाला सतरा नवरे
३९. मिळवत्या मुलीला मागणी फार
४०. रिकामी मुलगी शृंगार करी
४१. प्रेमात पडला हुंडयास मुकला
४२. दुरुन पाहुणे साजरे 
४३. ऑफीसात प्यून शहाणा
४४. सत्ता नको पण खैरनार आवर
४५. एक ना धड भाराभर पक्ष
४६. हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे
४७. थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे
४८. तोंडाला पदर गावाला गजर
४९. कष्टानं कमावलं बाटलीनं गमावल
५०. रात्र थोडी डास फार
५१. शिर सलामत तो रोज हजामत
५२. नेता छोठा कटआऊट मोठा
५३. चिल्लर पुरता सत्यनारायण
५४. दैव देते आयकर नेते
५५. डीग्री लहान वशिला महान...

Monday, 2 March 2015

Useful fruits

*आंबा *
Mangoआंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

                 *अंजीर *
Anjeerअंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.
अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

             *आवळा *
Awalaआवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

             * ऊस *
Sugar Caneऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणार्‍या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

               *द्राक्षे *
Grapesद्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

              *पपई *
Papayaपपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

           *लिंबु *
Limeलिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
            *जांभूळ *
Jamunजांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

           *डाळींब *
Dalimb Anarडाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

                *केळे *
Bananaकेळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

           *स्ट्रॉबेरी *
Strawberryचवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.
छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.
स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

            *बोरे *
Bor Berआंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

School Days...!

Khoop chaan kavita ..

अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा

Hahaha unending questions

लोकांना तुमची खूप काळजी असते,
खोट वाटतय...?
पहा हे प्रश्न तुम्हाला लोकांनी विचारले आहेत कि नाहीत...!
स्वताच्या lifeची माती झाली असेल तरी चालेल, पण दुसर्याला हे प्रश्न विचारायचेच.

●लहानपणी :-
१) काय रे मोठा/मोठी कधी होणार तू?
२) मोठेपणी कोण होणार (डॉक्टर,engineer,वकील)?
३) १०वि, 1२वि ला किती percentage काढणार ?

●मोठेपणी :-
१) जॉबला कधी लागणार?
२) जॉबला कुठे?
३) salary किती आहे तुला?
४) लग्न कधी करणार?

●लग्न झाल्यावर :-
१) तुझं अर्रेंज marriage कि लव marriage?
२) बायकोच गाव कोणत?
३) तिला किती भावू, बहिण, तिच्या घरी कोण कोण असत?
४) जर तुमच love marriage असेल तर, घरच्यांनी accpet केल का तुमच्या?
५) बायको जॉबला जाते का?
६) बायकोच शिक्षण किती?
७) good News कधी देणार?
८) family Planning करताय का?
९) घरी जेवण कोण करत बायको कि आई?
१०) बायकोला येत का जेवण करता, NON-VEG खाते का?
११) बायको vegetarian असेल तर, तुझ काय, तुझा problem होतो का? तुला nonveg बनवून देते का?
१२) घरच्यांशी पटते का बायकोचे?

●पोर झाल्यावर :-
१) normal delivery झाली कि सिझेरिअन?
२) नुकताच जन्म झालेल पोर पण आईसारखा दिसतो कि बापासारखा दिसतो यावर discussion
३) पोरांना english mediumमध्ये टाकणार, कि मराठी mediumमध्ये?

●म्हातारे झाल्यावर :-
१) तब्बेत काय म्हणते?
२) पोर बघतात का तुम्हाला?
३) सुने बरोबर पटत का?
४) २-३ मुल, मुली असतील तर घर कोणाच्या नावावर करणार?

●आणि सर्वात शेवटी मेल्यावर
"चांगला माणूस होता"

.......

Sunday, 1 March 2015

Story with nice message

����������������������

1 दिन एक राजा ने अपने 3 मन्त्रियो को दरबारb में  बुलाया, और  तीनो  को  आदेश  दिया  के  एक  एक  थैला  ले  कर  बगीचे  में  जाएं ..,
और
वहां  से  अच्छे  अच्छे  फल  (fruits ) जमा  करें .  ��������������
वो  तीनो  अलग  अलग  बाग़  में प्रविष्ट  हो  गए ,
पहले  मन्त्री  ने  कोशिश  की  के  राजा  के  लिए  उसकी पसंद  के  अच्छे  अच्छे  और  मज़ेदार  फल  जमा  किए जाएँ , उस ने  काफी  मेहनत  के  बाद  बढ़िया और  ताज़ा  फलों  से  थैला  भर  लिया ,

दूसरे मन्त्री  ने  सोचा  राजा  हर  फल  का परीक्षण  तो करेगा नहीं , इस  लिए  उसने  जल्दी  जल्दी  थैला  भरने  में  ताज़ा , कच्चे , गले  सड़े फल  भी  थैले  में  भर  लिए ,��

तीसरे  मन्त्री  ने  सोचा  राजा  की  नज़र  तो  सिर्फ  भरे  हुवे थैले  की  तरफ  होगी  वो  खोल  कर  देखेगा  भी  नहीं  कि  इसमें  क्या  है , उसने  समय बचाने  के  लिए  जल्दी  जल्दी  इसमें  घास , और  पत्ते  भर  लिए  और  वक़्त  बचाया .
��
दूसरे  दिन  राजा  ने  तीनों मन्त्रियो  को  उनके  थैलों  समेत  दरबार  में  बुलाया  और  उनके  थैले  खोल  कर  भी  नही देखे  और  आदेश दिया  कि , तीनों  को  उनके  थैलों  समेत  दूर  स्थान के एक जेल  में  एक सप्ताह क़ैद  कर  दिया  जाए .
��

अब  जेल  में  उनके  पास  खाने  पीने  को  कुछ  भी  नहीं  था  सिवाए  उन  थैलों  के ,
तो  जिस मन्त्री ने  अच्छे  अच्छे  फल  जमा  किये  वो  तो  मज़े  से  खाता  रहा  और  एक सप्ताह  गुज़र  भी  गया
��
फिर दूसरा मन्त्री जिसने ताज़ा , कच्चे  गले सड़े फल जमा किये  थे,  वह कुछ दिन तो ताज़ा फल खाता  रहा फिर उसे ख़राब फल खाने पड़े , जिस से वो बीमार हो गया और बहुत तकलीफ उठानी  पड़ी .

और  तीसरा मन्त्री  जिसने  थैले  में  सिर्फ  घास  और  पत्ते  जमा  किये  थे  वो  कुछ  ही  दिनों  में  भूख  से  मर  गया .

**** अब  आप  अपने  आप  से  पूछिये  कि  आप  क्या  जमा  कर  रहे  हो  ??
��
आप  इस समय जीवन के  बाग़  में  हैं , जहाँ  चाहें  तो  अच्छे कर्म जमा  करें ..
चाहें  तो बुरे कर्म ,
मगर याद रहे जो आप जमा करेंगे वही आपको आखरी समय काम आयेगा  क्योंकि दुनिया क़ा राजा आपको चारों ओर से देख रहा है  । ����☺

Joke

AIR INDIA KI BAAT HI KUCH AUR HAI ✈��

Air India Air Hostess to passenger:
"Sir would you like to have dinner?"

Passenger: "What are the options?"

Air Hostess: "Yes and No."��������

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….

१)       अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.

२)     घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.

३)     ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.

४)     ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.

५)     ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.

६)      ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.

७)     थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.

८)     ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.

९)      प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.

१०)   ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.

ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.
...आ हे ना छान ?

