Friday, 10 April 2015

आत्मविश्वास

����
!..........आत्मविश्वास.........!

एक व्यावसायिक कर्जात
बुडाला होता आणि त्यातून बाहेर
पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते
आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून
होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके
हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून
वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे
त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर
उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस,
मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने
त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून
त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर
एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट
आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून
तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने
हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता.
खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत
श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज
चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु
त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच
ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम
केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू
लागला. त्याने
आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली.
काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच,
तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर
आला आणि पुन्हा कमाई करू लागला. बरोबर
एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित
झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार
आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट
पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून
व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने
तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला?
हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे
म्हणून.ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता.
त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5
लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात
तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात
नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने
गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच
त्याला कर्जाचा डोंगर
उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य-
आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास
मिळते.

मित्रानो कथा जरूर share करा ...

धन्यवाद.

��������☺☺☺☺

Thursday, 9 April 2015

Local government - on whatsapp

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    ��ग्रामपंचायत�� 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ��ग्रामपंचायत�� म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.

✳ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी

✅ग्रामपंचायतींची कार्ये:

��१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
��२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
��३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
��४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
��५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
��६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
��७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
��८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते
आय पी सी (IPC) १८६०

कलम १४- शासकीय सेवक
कलम २१ -लोकसेवक
कलम २२- जंगम मालमत्ता
कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
कलम २४ -अपप्रमनिक्पने
कलम २५ -कपतिपनने
कलम २६- समजण्यास कारण
कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
कलम २९- दस्त्ताइवज
कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
कलम ३० -मुल्य वान रोखा
कलम ३३ -कृती अकृती
कलम ३४- सामाईक इरादा
कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम ४० -अपराध
कलम ४१- वी शे श  कायदा
कलम ४२ -थानीक कायदा
कलम ४४ -श ती / हानी
कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम ५२ (अ) -आसरा देणे

                   आपवाद
कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या        व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
    
             अप्प्रेर्णा वीषयी
कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम १०८- अप्प्रेरक
कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने

     सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
कलम १४१- बेकायदेशीर जमाव
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम १४३- शीक शा
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम १४६- दंगा करणे
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
कलम १५९- दंगल
कलम १६०- दंगल करण्याबद्दल शिक्षा

       लोक्सेवाकांकडून कींवा त्यासबंधी घडणाऱ्या अप्राधावीशइ
कलम १७०- लोक्सेव्काची बतावणी करून  तोत्यागीरी करणे
कलम १७१-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट  करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे

         लोक्सेव्कांच्या कायदेशीर   प्रधीकाराच्या अव्मानावीश इ
कलम १७२- समन्सची बजावणी  कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
कलम १८८- लोक्सेव्काने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे

        खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या वीरोधी अपराध
कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
कलम २२३- लोक्से
व्काने हयग इने बंदीवासातून कींवा ह्वाल्तीतून पळून जाऊ देणे

          सार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अप्रधान्वीशइ
कलम २७९- सार्वजनीक रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालवणे
कलम २९२- अश्लील पुस्तके इ. वी करी करण

        ध्म्स्बंधीच्या अप्रधान्वी श इ
कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अप्वीत्र  करणे
कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
कलम २९८- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे

       मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अप्रधावी श इ
कलम २९९- सदोष मनुष्यवध
कलम ३००- खून
कलम ३०२- खुणा बद्दल शी क्षा
कलम ३०४- सदोष मनुष्यवधा बद्दल शी क्षा
कलम ३०४(अ)- ह्य्ग्यीने मृतू स कारण
कलम ३०४(ब)- हुंडा बळी
कलम ३०६- आत्म्हत्तेला अपप्रेरणा देणे
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे
कलम ३२३- इच्छापुर्वक दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२४- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
कलम ३२५-  इच्छापुर्वक  जबर दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२६- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
कलम ३२६(अ)- असीड इ चा वापर करून  इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक असीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
कलम ३३०- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला  माल परत घेण्यासाठी  इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३२- लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३६- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
कलम ३३७- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
कलम ३३८-  इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने जबर  दुखापत पोचवणे
कलम ३३९- गैर नीरोध / आन्यायाने प्रतीबंध
करणे
कलम ३४०- गैर प्रीरोध/ आन्यायाने कैदेत ठेवणे 
कलम ३४१- गैर नीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४२- गैर परीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४९- बलप्रयोग
कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग
कलम ३५१- हल्ला / हाम्ला
कलम ३५२-  फौजदारी पात्र बलप्रयो गाबद्दल शी कशा
कलम ३५३-  लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४- शीरी चा वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(अ)- लैंगीक छ ळ व च छ लाब्द्द्ल  शीक्षा
कलम ३५४(ब)- शीरीला वी वस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(क)- चोरून अश्लील चीत्र्ण करणे
कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे
कलम ३५९- अप्ण्य्न /मनुश चोरून नेणे
कलम ३६२- अपहरण /प्ल्वुन नेणे
कलम ३६३- अप्ण्य्नाब्द्दल शी कशा
कलम ३७०- व्यक्तींचा अप्व्यापार करणे
कलम ३७५- बलात्कार
कलम ३७६- बलात्काराबद्दल शी कशा
कलम ३७७- अनैस्गीक सन्भोक
कलम ३७८ चोरी
कलम ३७९- चोरीबद्दल शी कशा
कलम ३८०- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम ३८३- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
कलम ३८४ - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शी कशा
कलम ३९०- जबरी चोरी
कलम ३९१- दरोडा
कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शी कशा 
कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
कलम ३९५- दरोड्याबद्दल शी कशा
कलम ३९९- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
कलम ४०५- फौज्दारीपात्र न्यास्भंग /विस्वास्घत
कलम ४०६- न्यास्भनगाब्द्दल शीक शा
कलम ४०९- लोक्सेवाकाने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने वी सवासघात करणे
कलम ४१०- चोरीची मालमत्ता
कलम ४११- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता  स्वीकारणे
कलम ४१५- ठक्वणूक
कलम ४१७- ठक्वणूक करण्याबद्दल  शीक शा
कलम ४२०- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
कलम ४२५- अप्कीर्या
कलम ४२६- अप्किर्य बद्दल  शीक शा
कलम ४३५- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा १० रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
कलम ४४१- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
कलम ४४२-गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
कलम ४४३- चोरटे गृह अतीक्रमण
कलम ४४४- रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण करणे
कलम ४४५- घरफोडी
कलम ४४७- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४४८- घर अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४५२- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
कलम ४५४- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४५७- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्री
च्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४६३- बना वटी करण
कलम ४६५-  बना वटी कर नाबद्दल शी कशा
कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी  बना वटी करण करणे
कलम ४९८(अ)- ए खांद्या सी रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
कलम ५०४- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम ५०६- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शी कशा
कलम ५०९- वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
कलम ५११- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा.
    .....  जनहितार्थ

हे आपला समाज जागृतीसाठी पाठवला आहे.

Mom, iphone and 18 conditions

आई, आयफोन आणि १८ अटी****

जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३
वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि
त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये
चर्चेचा विषय ठरलेली
ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट.

जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत.
तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे
भुणभुण करत होता की, मला
माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच!

शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे
काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं
खूळ नाही.
शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय
घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला
त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन!

पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली
त्याच्यासाठी आणलेल्या
नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती.
आयफोन हातात
आलेल्या मुलासाठी काही नियम होते त्या चिठ्ठीत.
जेनेल इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग लिहिते.
ग्रेगला लिहिलेली ती चिठ्ठी तिनं नंतर
आपल्या ब्लॉगवर टाकली आणि जगभरातल्या आया ते वाचून
भलत्याच खूश झाल्या.
लहान वयात टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी उतावीळ
असलेल्या हल्लीच्या मुलांना कसं
आवरावं आणि त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामांपासून त्यांना कसं
दूर ठेवावं या
चिंतेत असणार्या आयांना जेनेलनं आपल्या या ब्लॉगमधून जणू
एक नवा मार्गच
दाखवला आहे.

’माझ्या मुलाला तंत्रज्ञानाचं व्यसन लागू नये, त्यानं
त्याचा दुरुपयोग करू नये
असं मला वाटत होतं. तंत्रज्ञानाच्या आहारी न
जाता त्याचा उत्तम उपयोग कसा
करावा हे माझ्या मुलानं शिकावं असं मला वाटत होतं म्हणून
मी त्याला एकूण १८
अटी घातल्या ‘-

जेनेल हॉफमन लिहिते.
जेनेलच्या या १८ अटी सध्या इंटरनेटवर भलत्याच चर्चेत आहेत.
त्यांचा हा अनुवाद

प्रिय ग्रेग,

१. हा आयफोन
तुझ्यासाठी आणला असला तरी त्याची मालकी माझी आहे, कारण
याचे पैसे
मी दिलेले आहेत. हा फोन तुझा नाही,
तो मी तुला वापरायला दिलेला आहे, हे लक्षात
ठेव.

२. त्या फोनला पासवर्ड टाकलास, तर
तो मला माहिती असला पाहिजे.

३. रिंग वाजली की फोन उचलायचा. तो ’फोन’ आहे. त्यावर
तुझ्याशी बोलता येणं हा
त्याचा मूळ उपयोग आहे. शिवाय फोन न उचलणं असभ्यपणाचं
आहे. त्यामुळे ‘मॉम‘किंवा
‘डॅड’ हे नाव फ्लॅश झालं की तो फोन उचलायचा..लगेच!

४. रोज संध्याकाळी ७.३0 वाजता आणि शनिवार-
रविवारी रात्री फोन माझ्याकडे
द्यायचा. मी तो फोन रात्री बंद करीन आणि सकाळी ७.३0
वाजता चालू करून परत तुला
देईन. रात्री उशिरा तुला एखाद्या मित्राला, मैत्रिणीला फोन
करायचा झाला, तर तो
त्यांच्या घरच्या फोनवर करायचा. त्यांच्या आई-वडिलांपासून
लपवण्यासारखं त्यात
काही असेल, तर असा फोन न करणंच उत्तम.

५. फोन शाळेत घेऊन जायचा नाही. ज्या कुणाशी तुला फोनवरून
चॅटिंग करावंसं वाटतं
त्यांच्याशी प्रत्यक्ष बोल. गप्पा मार. ही गोष्ट छान आयुष्य
जगण्यासाठी फार
आवश्यक आहे.

६. हा फोन पाण्यात पडला, संडासात पडला, हरवला
फुटला किंवा त्याचं काहीही
नुकसान झालं तर त्याच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटचा खर्च
करणं ही तुझी
जबाबदारी असेल. त्यासाठी तू सुट्टीत काम करू शकतोस,
वाढदिवसाच्या पार्टीचे
पैसे वाचवू शकतोस किंवा खाऊला दिलेले पैसेही त्यासाठी वापरू
शकतोस. फोनच्या
बाबतीत अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्याची तयारी ठेव.

७. या फोनचा वापर कधीच कोणाशी खोटं
बोलायला किंवा कोणाला फसवायला करू नकोस.
भांडणं झाली तर एक चांगला मित्र जसा वागेल तसा वाग
आणि नाहीतर त्या भांडणात
पडू नकोस.

८. ज्या गोष्टी तू प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला सांगू शकत
नाहीस त्या एसएमएस, मेल
किंवा फोन करून सांगू नकोस.

९. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आईवडिलांसमोर तू
जी गोष्ट बोलणार
नाहीस, ती फोन वापरून लपून मेल, एसएमएस किंवा फोन करून
सांगू नकोस.

१0. फोनवर कुठलंही साहित्य उघडायचं नाही. तुला इतर
कामासाठी, प्रोजेक्टसाठी जी
माहिती हवी असेल त्यासाठी जरूर फोनवरचं इंटरनेट वापर. पण
त्याव्यतिरिक्त तुला
काही प्रश्न असतील तर माझ्याशी किंवा डॅडशी मोकळेपणानं
बोल.

११. सार्वजनिक ठिकाणी, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये
किंवा कुठल्या माणसाशी बोलत
असताना फोन सायलेंट कर किंवा बंद कर, पण तो बाजूला ठेवून दे.
समोरचा माणूस
बोलत असताना आपण फोनशी खेळ करणं उद्धटपणाचं आहे.
शिवाय आयफोन ही बोलण्यासाठी
वापरायची एक गोष्ट आहे. तो मिरवायचा स्टेट्स सिम्बॉल नाही.

१२. तुझ्या स्वत:च्या किंवा इतर कोणाच्या खासगी भागांचे
फोटो काढून ते शेअर
करू नकोस. हसू नकोस! मला माहिती आहे की तुला सगळं समजतं.
पण तरीही तुला असा
मोह कधीतरी पडू शकतो. सायबर स्पेस खूप मोठी आहे आणि इथे
एकदा आलेली प्रत्येक
गोष्ट, वाक्य, फोटो, कॉमेंट कायम इथेच राहतं.
अशा एखाद्या गोष्टीमुळे तुझं
संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं.

१३. उगीच हजारो फोटो आणि व्हिडिओ काढत बसू नकोस.
प्रत्येक गोष्ट काही फोटो
काढून ठेवण्याइतकी महत्त्वाची नसते. त्यापेक्षा तो क्षण
मनापासून एन्जॉय कर, ते
तुझ्या का यम लक्षात राहील.

१४. कधीतरी फोन घरी ठेवून बाहेर पड. फोन बरोबर नाही म्हणजे
काहीतरी
चुकतंय, काहीतरी
राहून जातंय असं वाटून घेऊ नकोस. फोन न नेल्यामुळे
काही गोष्टी मिस् होतील. तर
त्या होऊ देत. पण त्या वेळात तुला जे मिळेल ते त्या ’फिअर
ऑफ मिसिंग आऊट’पेक्षा
मोठं असेल.

१५. सगळे जण ऐकतात त्यापेक्षा वेगळं संगीत ऐक. शास्त्रीय
संगीत ऐक. तुम्हाला
आजवर कधीच नव्हतं एवढं संगीत नेटवर सहज उपलब्ध आहे.
त्याचा फायदा घे.

१६. मेंदूला ताण देणारे खेळ, शब्दांचे खेळ, कोडी मधून मधून खेळत
जा.

१७. डोळे कायम उघडे ठेव. खिडकीच्या बाहेर काय आहे ते बघ.
पक्ष्यांचे आवाज
येतात का ते बघ, पाऊस हातावर घेऊन बघ, पायी चक्कर
मारायला जा.
गूगलशिवाय इतर
गोष्टींमधली मजा समजून घे.

१८. मला माहितीये की तू यातले नियम मोडशील. मग मी फोन
काढून घेईन.
मग आपण
त्यावर बसून चर्चा करू.
मग तू परत प्रॉमिस करशील. मग
मी तुला फोन परत देईन.
आपण पुन्हा सुरुवात करू..
काय? चालेल नं?
आयफोनबरोबर कसं
वागायचं हे तू
पहिल्यांदा शिकतो आहेस,
तशी माझीही ही पहिलीच तर वेळ आहे.

- मला अशी आशा आहे की, या अटी तुला मान्य असतील.
यातल्या बहुतेक सगळ्य़ा अटी
जरी नुसत्या फोनच्या बाबतीतल्या वाटल्या तरी त्या एकूणच
आयुष्याबद्दल आहेत. तू
आणि तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी..
रोज बदलतायत, रोज
वाढतायत.
हे खूप एक्सायटिंग
आहे पण त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे
होता होईल तेवढय़ा गोष्टी
साध्या सरळ सोप्या ठेवायचा प्रयत्न कर.
आणि सगळ्य़ात
महत्त्वाचं म्हणजे
कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा तुझं मन आणि तुझी बुद्धी यावर
जास्त विश्वास ठेव.
तुझ्या नवीन आयफोनसाठी खूप खूप शुभेच्छा!

तुझीच,
मॉम****""