कोणे एके काळी म्हणे...
.
'Windows' म्हणजे एक 'खिडकी' होती आणि 'Applications' म्हणजे कागदावर लिहिलेला 'विनंती अर्ज' होता...
.
जेव्हां 'Keyboard' म्हणजे 'पियानो' आणि 'Mouse' म्हणजे फक्त 'उंदिरच' होता...
.
जेव्हां 'File' ही कार्यालयातील 'एक महत्वाची वस्तू' होती आणि 'Hard Drive' म्हणजे महामार्गावरील वरील 'एक जिकिरीचा वाहन प्रवास' होता...
.
जेव्हां 'Cut' हे 'चाकूने किंवा धारदार शस्त्राने' करत होते आणि 'Paste' हा 'डिंका' ने करत होते...
.
जेव्हां 'Web' म्हणजे 'कोळ्याचे जाळे' होते आणि 'virus' ने फक्त 'तापच' येत होता...
.
जेव्हां 'Apple' आणि 'Blackberry' ही केवळ 'फळेच' होती...
.
त्यावेळी म्हणे आपल्याकडे कुटुंबासाठी, आणि मित्र-मैत्रिणींसाठी मुबलक वेळ होता...!!!
.
कोणे एके काळी म्हणे...
खरंच काय असं होतं...???
...............
आत्मचिंतन !!
उगीच मोकाट फिरण्यापेक्षा
घरात शांत बसलेले बरे
लोकांना बेकार दिसण्यापेक्षा
घरात भांडी घासलेले बरे..!!
श्रीमंती आव आणण्यापेक्षा
ओळख खरी दिसलेले बरे
नाव्हीची उधारी ठेवण्यापेक्षा
घरात दाढी तासलेले बरे..!!
गावाचा- गाडा हाकण्यापेक्षा
घरची गाडी पुसलेले बरे
फुकट हमाली करण्यापेक्षा
गावगाड्यात नसलेले बरे..!!
लाचार होऊन जगण्यापेक्षा
कष्टाने आता कसलेले बरे
सुखाची दुःखात घालण्यापेक्षा
प्रेमाने सर्वांशी हसलेले बरे..!!
..............
आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?
चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?
कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?
मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?
निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?
लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?
चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?
घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?
चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?
जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही'?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?
No comments:
Post a Comment