घर म्हणजे भिंती नव्हेत
हे बिल्डरला सांगणार कोण?
आयुष्य म्हणजे हिशेब नाही हे
सी.ए. ला सांगणार कोण?
जीवन म्हणजे कोर्ट नाही हे
वकिलास सांगणार कोण?
हृदय म्हणजे केवळ अवयव नाही हे
वैद्यकास सांगणार कोण?
बेदरकार वागण्यात तारुण्य नाही
हे तरुणास सांगणार कोण?
केवळ वयात मोठेपणा नाही हे
ज्येष्ठास सांगणार कोण?
तुलाही आहेत आईवडील हे
तरुण सुनेस सांगणार कोण?
एक लेक तुम्हासही आहे हे
सासूस सांगणार कोण?
देव म्हणजे मूर्ती नव्हे हे
पुजाऱ्यास सांगणार कोण?
डोळ्यातले पाणी हे पाणी नव्हे
हे कोरड्यास सांगणार कोण?
No comments:
Post a Comment