Thursday, 19 March 2015

Don't do drugs

बापाची चप्पल पायात येतीय
मग तु वयात चांगला आलाय
म्हणून लक्षण रेषा ओलंडण्यास
आता तू मोकळा झालाय

मीञांचा   गोतावळा थोडा थोडा
वाढत रहाणार
घराचा उंबराही हळूहळू तू
सोडत जाणार

सिक्रेट देण्याघेण्यासाठी निवांत
बसावं लागेल आणि कधीतरी मित्राच्या आग्रहात
फसावं लागेल

गंमत म्हणून धुरांच्या गाड्या
हवेत सुटतील
हिंमत देत  मित्रही लाईटर वाले
नवेच भेटतील

असच कधीतरी हातात रंगीत ग्लास
सुद्धा येतील
सुरुवात बीअरने करुन नंतर सल्ला
दारूचा देतील

वास येत असेल तर नाक
दाबुन पी
एकदम न घेता घोट घोट
थांबून पी

कडवटपणा जाण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक टाकून पी
ठसका लागला तर थोडी थोडी
वाकून पी

जास्तच चढल्यावर रात्री घरात
उशीरा जा
कुणाला वास येवू नाही म्हणून
पुदिना खा

मैत्रीचा दाखला देत तुला घरापर्यंत 
सोडतील
तुझ्या साठी एखाद्याचं तंगडही
मोडतील

दोन तिन वेळेस मित्रच
आग्रहाने पाजतील
चौथ्या वेळेस मात्र तुलाच
हक्काने मागतील

घराच्यांना कसं बनवायचं हे तर
सहज शिकवतील
एखादी चोरलेली वस्तु बिन बोभाट
लगेच विकवतील

मग प्रत्येक विकएन्डला ठरेल
एकाएकाची पार्टी
पार्टीत आण म्हणतील
एखादी कार्टी

पैसाचं कारण तू त्यांच्यापुढे
मांडणार
ते सांगतील तस तू आईबापाला
भांडणार

तुझी बनवेगीरी प्रेमाआड खरीच
वाटून राहील
खरं कळल्यावर मात्र त्यांच काळीज
फाटून जाईल

तोपर्यंत तुझं मन ठार
मेलेले असणार
माणूसकी सोडण्याची सिमा पार
केलेले असणार

खिसा गरंम असेपर्यंत मित्रांची
साथ असेल
तुझा झरा आटल्यावर त्यांचीच
लाथ बसेल

शेवटी एकटाच देशी नाहीतर 
हातभट्टी पेशील
नातेवाईका बरोबर जगण्यालाही
सोडचिट्टी देशील

मग मात्र आईबापच पुन्हा
धावून येतील
किडण्या बदलण्यासाठी तुला
घेऊन जातील

म्हणून पार्टीतील मित्रांची खबरदारी
खरंच आतापासुन घे
मैत्री करण्यापुर्वी त्यांची कुंडली
संपूर्ण तपासून घे

अरे आत्ताच कुठे तू अठरा वर्षाचा
झालाय
८०% जीवन प्रवास अजून बेरजेचा राहिलाय.....

( कोणी लिहलं आहे माहीत नाही पण ज्यांनी लिहलंय त्यांना माझा सलाम मि फक्त काॅपी केले आहे. )

Wednesday, 18 March 2015

Gomutra

��देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव .नक्की वाचा.��
����������

कोल्हापूर - देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. रामणवाडी (ता. राधानगरी) या गावात 80 देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे. या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे. 
गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे. रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे. आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते. 
येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या. गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच; शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला. बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी काही कुटुंबे आहेत. यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे. 
गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे; पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते. देश- विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले. तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते. आता मात्र रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे. 
सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत आठ रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून 11 ते 12 रुपये मिळवून देते. मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते. 
देशी गाईचे वाळलेले शेण "रानगोवरी‘ या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते. गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. 
या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यातचांगलाच यशस्वी झाला आहे. 
वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे. ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे. गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे (9372208108) यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे. 

वाढती मागणी 
सध्या "गोधन‘ या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून एक लिटर अर्क केलेले गोमूत्र 125 रुपयांना, 200 मिली गोमूत्र 35 रुपयांना व पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून 10 मिली गोमूत्र 10 रुपयांना विकले जाते. पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.

देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत. गाय दुधाला कमी झाल्यावर मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत ,तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे . शेतकऱ्यांनी याचा फायदा शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून  गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो. काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते.देशी गायीच्या  गोमुत्राने कॅनसर बरा होतो.गाईचा स्पर्श नकोसा  वाटतो.ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर वशिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे.शेण रेडिएशन शोषते.
पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत. जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे. पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा देशी गाईचे दुध पिउन अतिबुद्धिमान, बलवान, चपळ आणि प्रेमळ व्हावे.
सर्वानी शेअर करा .लोकाना सत्य समजु द्या .��
��������������

SsShhh it's sleeping

माझी सावली माझे काव्य.
“ मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “
गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll
भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा बोल त्यांचे खोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा
आपले मत पैशाने.. तोलत रहा
कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे तसे नको उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll...
ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने
कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!

I forgot

(मी काय विसरलो)

घरात टी वी आला,
         मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
          मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
   मी पञलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
   पाढेच म्हणणे विसरलो।
ए सी च्या संगतीने,
    झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहील्या मुळे,  मातीचा वासच विसरलो।
बँकखाती संभाळताना,   पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे,
   सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,   फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
  तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,   खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाचे लोभात, सत्कर्मातला  आनंद विसरलो।
माझीच तुमडी भरताना,
दुस-यांचा विचार करणे विसरलो।
सतत धावत असताना, क्षणभर थांबणं विसरलो।
जागेपणीच सुख जाऊ द्या,
पण सुखाने झोपणेही विसरलो।

(शोध चिंतनाचा)

WhatsApp Rancho

3 Idiots part 2.....
Rancho: *Smiling* ��

Teacher: Aap muskura kyu rahe ho? ��

Rancho: Bahot dino se Whatsapp me account banane ki ichha thi...aaj bana diya hai...bohot maza aa raha hai.��

Teacher: Zyaada maza lene ki zarurat nai hai...
Tell me, what is a Post?

Rancho: Anything that is posted on Whatsapp is a Post, Sir.��

Teacher: Can you please elaborate? ��

Rancho: Sir...jo bhi Whatsapp pe log daalte hai post hai sir...
Ghumne gaye...photo daal diya! Post hai Sir.
Match dekha, score daal diya!
Post hai Sir...
Katrina ki pic se Ronaldo ki kick tak! Sab post hai sir!
Ek second me comment, ek second me reply!
Comment-reply...
Comment-reply... ��

Teacher: Shut up! Account banake ye karoge? Comment-reply.. Comment-reply..? ��
Haan Chatur, tum batao.

Chatur: Pictures, texts or videos posted through mobile or tablet via different operating systems using internet on whatsapp is called a Post... ��

Teacher: Excellent!��

Rancho: Par sir maine bhi toh wahi bola seedhe shabdo mein...��

Teacher: Seedhe shabdo me karna hai toh Facebook ya twitter ke pages pe account banao... ��

Rancho: Par sir dusre sites bhi toh...

Teacher: Get out! ������

Rancho: Why sir?��

Teacher: Seedhe shabdo me bahar jaiye.

Rancho goes out and comes back.

Teacher: Kya hua?

Rancho: Kuch bhool gaya tha sir.

Teacher: Kya?

Rancho: A utility button given to us, to protect our private data i.e. pictures, messages or personal information for being stolen or used for bad purpose by hackers or anyone else...��

Teacher: Arre, kehna kya chaahte ho!?!?��

Rancho: Logout sir! Logout karna bhool gaya tha. ��

Teacher: Toh seedha seedha nahi bol sakte the?!��

Rancho: Thodi der pehle try kiya tha sir, Aapko pasand nahi aaya...��







Jaldi forward karo, market mein naya hein
������������?

Saturday, 14 March 2015

English-Malvani

इंग्रजीला मालवणी पर्याय,

Dude - भावाशी..
Awesome - टकटकीत..
Oh my god - अरे महापुरसा...
Brilliant - आवशीक खाव व्हरान...
Be quick - मेल्या आटप....
Best - भारीच...
Don't challenge - वार्तेक येव नको.....��
Relaxed - काळजी नाय धोको...खावन पडलो बोको..
Go to sleep - वायच आडयो पड...
r u Stupid - भिरकाटला काय रे तूझा....
Have u gona mad - टाळक्या जाग्यार हा मा...
Great - मस्तच...
Come on - पेटवन टाक...
Hi dude - काय भावाशी....बरो मा...
u r too fast - तूका लय घाय...
Fresh - वायच बरा वाटला...
Tough - घसघशीत....
Plot a scheme - नायसो करीन...
In form - मेल्या आगच मरे....
Simple - काय्येक अर्थ नाय...
Come on .. u can do it - टाक पेटवन...
Fooled someone - मेल्याचो मामा केल्यानी....
आपली बोली.....आपला बाणा....
��������������������������

Friday, 13 March 2015

Pledge

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते. पण आजवर ती कुणी लिहिली , तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील. परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही. मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.

बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की , त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे , कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता. मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही. पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना , विद्वानांना , पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना , शिक्षणमंत्री , साहित्यिक , लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल! परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो! आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत , तेलगू , इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली. शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता , तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.
२६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.
आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच. यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.