Wednesday, 20 May 2015

After forty poem

पाडगावकरानी
आता 'दिवस तुझे हे फुलायचे' याचे विडंबन चाळीशी नंतर 'दिवस तुझे हे फुगायचॆ' केलयं. त्या अनाम कवीला सलाम...

दिवस तुझे हे फ़ुगायचे
मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥

लाडकी माझी तु राणी
नको तु खाऊ गं लोणी
पाण्यात लिंबाला पिळायचे
मोजून मापून जेवायचे॥१॥
दिवस तुझे.....

साजुक तुपाची धार
वाढवी calories फ़ार
पोटात salad भरायचे
मोजून मापून जेवायचे॥२॥
दिवस तुझे.....

प्रभाती फिराया जाणे
जाताना धापा टाकणे
दमून मटकन बसायचे
मोजून मापून जेवायचे॥३॥
दिवस तुझे.....

वजन वाढते फ़ार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे
मोजून मापून जेवायचे॥४॥
दिवस तुझे .....

आपुल्या घरच्यापाशी
फिर तू गडे जराशी
हालत चालत राहायचे
मोजून मापून जेवायचे॥५॥
दिवस तुझे ......������������

No comments:

Post a Comment