Wednesday, 6 May 2015

Just like that

विरंगुळा....निरीक्षणाचा

नेमस्त असावं राहूल द्रविड सारखं...

वाचाळ असावं नवज्योत सिद्धु सारखं......

प्रसिद्धी पिपासु असावं विनोद कांबळी सारखं....

बर्फ ही गोठावा इतकं थंड असावं महेंद्र धोनी सारखं.....

बॅट हाती न घेता क्रिकेट महर्षि व्हावं हर्षा भोगले सारखं....

IPL 'गंभिर' पणे खेळावं ते गौतम गंभिर सारखं....

बावळट पण निरागस असावं किशोर प्रधान असावं....

बावळट पण आचरट असावं राहूल प्रमोद महाजन सारखं....

सरकारी खर्चावर पर्यटन करावं नरेंद्र मोदी सारखं....

मतपेटी 'रिकामी' असूनही लोकप्रिय असावं राज ठाकरे सारखं....

तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं बाळासाहेब
ठाकरें सारखं....

लोकांच्या अपेक्षांची माती करावी राहूल गांधी सारखी...

बेरकी आणि कारस्थानी असावं अमित शहा सारखं....

३५ वर्षात जे कमावलं ते 'एका' वर्षात गमवावं नारायण राणे सारखं....

लायकी च्या तुलनेत बरच महत्त्व प्राप्त व्हावं ते अण्णा हजारें सारखं....

मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा बराक आबामा सारखंां....

विद्वान असुनही मस्करीचा विषय बनण्यात धन्यता मानावी मनमोहन सिंह सारखी.....

एकनिष्ठपणे पाठीशी उभं रहावं 'बाळा नांदगावकर' सारखं.....

अपयशाने न खचता ध्येयापाई आयुष्य वेचावं दलाई लामा सारखं...

बटबटीत आणि ओंगळवाणं असावं राखी सावंत सारखं.....

सालस आणि सेक्सी दिसावं दिपिका पडुकोण सारखं....

प्रेमात नेस्तनाबूत व्हावं मोनिकी बेदी सारखं....

भुतकाळाला फाट्यावर मारुन वर्तमानात मस्त जगावं सनी लियाँन सारखं  ......

सुंदर चेहरा पण कुरुप smile नसावं प्रिया बापट सारखं.....

स्वत:च्या 'सर्जनशील'ते पोटी 'surgeon' नवय्राला घरी बसवावं माधुरी दिक्षीत सारखं....

Item song मध्ये specialisation करावं ते मला़यका अरोरा खाँ सारखं.....

पुरुषांच्या क्षेत्रात ठसा उमटवावा बरखा दत्त सारखा....

Media च्या नाकावर टिच्चून affair मिरवावं ते अनुष्का-विराट सारखं....

बाॅलीवुड मध्ये मराठीपण जपावं नाना पाटेकर सारखं....

स्वत:च्याच प्रतिभेचे धिंधवडे काढावेत राम गोपाल वर्मा सारखे....

कर्मयेागी आणि निस्सिम समाजसेवा करावी आमटे कुटुंबा  सारखी.....

गुन्हेगार व्हावंसं वाटलं तर दाऊद इब्रहीम सारखं व्हावं......

कवितेचा अपमानच नाहीतर विनयभंग करु नये रामदास आठवले सारखा......

फक्त उत्क्रृष्टतेचाच ध्यास असावा गुलझार जींसारखा....

हजरजबाबी असावं कपिल शर्मा सारखं....

'यजमान' असूनही 'पाहुण्यांचा' सतत पाणउतारा करावा अरनब गोस्वामी सारखा......

शर्टाचं फिटींग कसं नसावं तर मुकेश अंबानी सारखं.....

सहकुटुंब सहपरिवारात गोकुळात नांदावं सलिम खाँ सारखं.....

आयुष्यभर साडेसाती नसावी संजय दत्त सारखी.....

७५ व्या वर्षी 'मागणी' आणि 'busy' असावं अमिताभ बच्चन सारखं.....

४० व्या वर्षी निव्ृत् व्हावं सचिन तेंडुलकर सारखं......

सोन्याची अंडी देणारी कोंबडी असावी IPL सारखी.....

'कात' टाकावी मराठी सिनेमा सारखी.....

वर्षानुवर्ष एकच चव टिकवावी ती "चितळे" आणि "मामलेदार" सारखी...

कशाचाही जाजवल्य अभिमान बाळगावा पुणेकरां सारखा.....

लिहीण्याची हौस असावी
माझ्या सारखी....
सहनशीलता हवी
तुमच्या सारखी

No comments:

Post a Comment