Monday, 22 June 2015

Would it be such a loss ?

Would it be such a loss ? 

Would it be such a loss if I didn't read the newspaper at breakfast, 
And talked to my family instead 

Would it be such a loss if didn't check my mobile every 10 seconds, 
And paid attention to my partner instead

Would it be such a loss if I didn't update each activity on Facebook, 
And updated my family about my day instead

Would it be such a loss if I didn't spend late nights at work, 
And read bedtime stories to my children instead

Would it be such a loss if I didn't attend a party, 
And had dinner at home with my parents instead

Would it be such a loss if I didn't stay up late net surfing,
And went for an early morning walk instead

Would it be such a loss if I didn't work out in the gym today 
And helped out with the housework instead

Would it be such a loss if I didn't what's app my best friend on his birthday, 
And turned up on his doorstep with a cake instead

Would it be such a loss if I did my colleague's work, 
And didn't care if he got the credit instead 

Would it be such a loss if didn't talk on the phone while crossing the road 
And helped someone across instead

Would it be such a loss if I didn't care how I looked, 
And cared how I behaved instead

Would it be such a loss if I didn't do what I do each day,
And lived life just the way it's meant to be...������

डबक्याबाहेर पडताना

एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ.

सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची.

माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते.

लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल.

पण बेडूक काही ऐकत नाहीत.

स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’

तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात.

टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल.

एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात.

एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो.

वर जाऊन पाहतो.

ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो.

लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात.

हे घडलं कसं?

तो बेडूक खाली उतरतो.

सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी?

तरी तू डबकं कसं काय सोडलंस?

तो बेडूक काहीच बोलत नाही.

तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही.

सगळे गप्प होतात..

त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.

इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?
यातून जमेल तर काहीतरी शिका..........
प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका.
   : कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त " शक्ती " असून चालत नाही ,
तर त्याला " सहनशक्ती "चीही जोड
असावी लागते.....!!!

Saturday, 20 June 2015

Yoga day

Why 21 June was chosen as International Yoga Day?

United Nations has passed a resolution declaring June 21 every year as the International Yoga Day (World Yoga Day). India’s Prime Minister Narendra Modi had urged the International Community to adopt 21 June as the International Yoga Day.

Every year in Northern hemisphere, the Summer Solstice falls on June 21. It is the day when Day is longest and the night is shortest. It is the day when Earth is at its closest distance from the Sun on its orbit.

From the perspective of yoga, the Summer Solstice marks the transition of Sun from Uttarayana to Dakshinayana, according to ancient Vedic Calendar. According to Vedic Books, it was the day when Lord Shiva, first taught Yoga to his disciples. The knowledge of Yoga first descended from Shiva on this day. We can say, June 21 as the Birthday of Yoga. This is the reason why several Yogic Preachers had advocated celebrating June 21 as the International Yoga Day.

Friday, 19 June 2015

Incredible Language

श्रीरामकृष्ण विलोमकाव्यम् - हे दैवज्ञ सूर्यकवी विरचित आहे. याला विलोम काव्य असे म्हणतात. यात श्लोकाच्या पहिल्या ओळीचा अर्थ रामाविषयी तर दुसऱ्या ओळीचा अर्थ कृष्णविषयी होतो. या काव्याचे वैशिष्ट्य असे की, यातील श्लोकामधे पहिली ओळ शेवटच्या अक्षराकडून पहिल्या अक्षराकडे अशी उलट (विलोम) वाचली असता, दुसरी ओळ तयार होते. वाचकांच्या दृष्टीने अतिशय रंजक पण रचण्यास अतिशय अवघड अशी ही रचना असून आपणांस आवडेल अशी आशा करतो.

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्री:|
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम्||

(रामपक्षी)
अर्थ – सीतेची सुटका करणाऱ्या गंभीर हास्य असणाऱ्या, भव्य असा अवतार
असणाऱ्या, व ज्याच्यापासून सर्वत्र दया व शोभा प्राप्त होतात अशाला(त्या रामचंद्राला) मी वंदन करतो.

(कृष्णपक्षी)
अर्थ – भव्यप्रभा असणारा सूर्य व जलमय चंद्र यांचाही जो देव त्याला, संहार करणाऱ्या (पूतने)लाही मुक्ति देणाऱ्याला, आणि, सृष्टीला प्राणभूत असणाऱ्या त्या यदुनंदनाला मी वंदन करतो.

संपूर्ण विलोमकाव्यं:

।। रामकृष्ण विलोम काव्यं (कवि सूर्य) ।।

तं भूसुतामुक्तिमुदारहासं, वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः |
श्रीयादवं भव्यभतोयदेवं, संहारदामुक्तिमुतासुभूतम् ||१||
चिरं विरंचिर्न चिरं विरंचिः , साकारता सत्यसतारका सा |
साकारता सत्यसतारका सा, चिरं विरंचिर्न चिरं विरंचिः ||२||
तामसीत्यसति सत्यसीमता, माययाक्षमसमक्षयायमा |
माययाक्षसमक्षयायमा, तामसीत्यसति सत्यसीमता ||३||
का तापघ्नी तारकाद्या विपापा, त्रेधा विद्या नोष्णकृत्यं निवासे |
सेवा नित्यं कृष्णनोद्या विधात्रे, पापाविद्याकारताघ्नी पताका ||४||
श्रीरामतो मध्यमतोदि येन, धीरोऽनिशं वश्यवतीवराद्वा
द्वारावतीवश्यवशं निरोधी, नयेदितो मध्यमतोऽमरा श्रीः ||५||
कौशिके त्रितपसि क्षरव्रती, योऽददाद्ऽद्वितनयस्वमातुरम् |
रन्तुमास्वयन तद्विदादयोऽतीव्ररक्षसि पतत्रिकेशिकौ ||६||
लम्बाधरोरु त्रयलम्बनासे, त्वं याहि याहि क्षरमागताज्ञा |
ज्ञातागमा रक्ष हि याहि या त्वं, सेना बलं यत्र रुरोध बालम् ||७||
लङ्कायना नित्यगमा धवाशा, साकं तयानुन्नयमानुकारा |
राकानुमा यन्ननु यातकंसा, शावाधमागत्य निनाय कालम् ||८||
गाधिजाध्वरवैरा ये, तेऽतीता रक्षसा मताः |
तामसाक्षरतातीते, ये रावैरध्वजाधिगाः ||९||
तावदेव दया देवे, यागे यावदवासना |
नासवादवया गेया, वेदे यादवदेवता ||१०||
सभास्वये भग्नमनेन चापं, कीनाशतानद्धरुषा शिलाशैः |
शैलाशिषारुद्धनताशनाकी, पञ्चानने मग्नभये स्वभासः ||११||
न वेद यामक्षरभामसीतां, का तारका विष्णुजितेऽविवादे |
देवाविते जिष्णुविकारता का, तां सीमभारक्षमयादवेन ||१२||
तीव्रगोरन्वयत्रार्यो, वैदेहीमनसो मतः |
तमसो न महीदेवै- र्यात्रायन्वरगोव्रती ||१३||
वेद या पद्मसदनं, साधारावततार मा |
मारता तव राधा सा, नन्द सद्मप यादवे ||१४||
शैवतो हननेऽरोधी, यो देवेषु नृपोत्सवः |
वत्सपो नृषु वेदे यो, धीरोऽनेन हतोऽवशैः ||१५||
नागोपगोऽसि क्षर मे पिनाकेऽनायोऽजने धर्मधनेन दानम् |
नन्दानने धर्मधने जयो ना, केनापि मे रक्षसि गोपगो नः ||१६||
ततान दाम प्रमदा पदाय, नेमे रुचामस्वनसुन्दराक्षी |
क्षीरादसुं न स्वमचारु मेने, यदाप दाम प्रमदा नतातः ||१७||
तामितो मत्तसूत्रामा, शापादेष विगानताम् |
तां नगाविषदेऽपाशा, मात्रासूत्तमतो मिता ||१८||
नासावद्यापत्रपाज्ञाविनोदी, धीरोऽनुत्या सस्मितोऽद्याविगीत्या |
त्यागी विद्यातोऽस्मि सत्त्यानुरोधी, दीनोऽविज्ञा पात्रपद्यावसाना ||१९||
संभावितं भिक्षुरगादगारं, याताधिराप स्वनघाजवंशः |
शवं जघान स्वपराधिताया, रङ्गादगारक्षुभितं विभासम् ||२०||
तयातितारस्वनयागतं मा, लोकापवादद्वितयं पिनाके |
केनापि यं तद्विदवाप कालो, मातंगयानस्वरतातियातः ||२१||
शवेऽविदा चित्रकुरङ्गमाला, पञ्चावटीनर्म न रोचते वा |
वातेऽचरो नर्मनटीव चापं, लामागरं कुत्रचिदाविवेश ||२२||
नेह वा क्षिपसि पक्षिकंधरा, मालिनी स्वमतमत्त दूयते |
ते यदूत्तमतम स्वनीलमा-राधकं क्षिपसि पक्षिवाहने ||२३||
वनान्तयानस्वणुवेदनासु, योषामृतेऽरण्यगताविरोधी |
धीरोऽवितागण्यरते मृषा यो, सुनादवेणुस्वनयातनां वः ||२४||
किं नु तोयरसा पम्पा, न सेवा नियतेन वै |
वैनतेयनिवासेन, पापं सारयतो नु किम् ||२५||
स नतातपहा तेन, स्वं शेनाविहितागसम् |
संगताहिविनाशे स्वं, नेतेहाप ततान सः ||२६||
कपितालविभागेन, योषादोऽनुनयेन  सः |
स नये ननु दोषायो, नगे भाविलतापिकः ||२७||
ते सभा प्रकपिवर्णमालिका, नाल्पकप्रसरमभ्रकल्पिता |
ताल्पिकभ्रमरसप्रकल्पना, कालिमर्णव पिक प्रभासते ||२८||
रावणेऽक्षिपतनत्रपानते, नाल्पकभ्रमणमक्रमातुरम् |
रन्तुमाक्रमणमभ्रकल्पना, तेन पात्रनतपक्षिणे वरा ||२९||
दैवे योगे सेवादानं, शङ्का नाये लङ्कायाने |
नेयाकालं येनाकाशं, नन्दावासे गेयो वेदैः ||३०||
शङ्कावज्ञानुत्वनुज्ञावकाशं, याने नद्यामुग्रमुद्याननेया |
याने नद्यामुग्रमुद्याननेया, शंकावज्ञानुत्वनुज्ञावकाशम् ||३१||
वा दिदेश द्विसीतायां, यं पाथोयनसेतवे |
वैतसेन यथोपायं, यन्तासीद्ऽविशदे दिवा ||३२||
वायुजोऽनुमतो नेमे, संग्रामेऽरवितोऽह्नि वः |
वह्नितो विरमे ग्रासं, मेनेऽतोऽमनुजो युवा ||३३||
क्षताय मा यत्र रघोरितायु-रङ्कानुगानन्यवयोऽयनानि |
निनाय यो वन्यनगानुकारं, युतारिघोरत्रयमायताक्षः ||३४||
तारके रिपुराप श्री-रुचा दाससुतान्वितः |
तन्वितासु सदाचारु, श्रीपुरा पुरि के रता ||३५||
लङ्का रङ्कांगराध्यासं, याने मेया काराव्यासे |
सेव्या राका यामे नेया, संध्यारागाकारं कालम् ||३६||

।। इति श्रीदैवज्ञपण्डित सूर्यकवि विरचितं
विलोमाक्षररामकृष्णकाव्यं समाप्तम् ।।

अशी काव्यरचना जगातील इतर कोणत्याही भाषेत असणे शक्य नाही

हे अफाट व अचाट आहे,

अधिक मास

येत्या 17 तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे मला माहितीच्या महाजालावर सापडलेली अधिक मासाची माहिती जशीच्या तशी
देत आहे. अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व
हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते.
परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.
या अधिकमासात वर्ज्य असलेली कृत्ये - देव प्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये.
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात )
म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
* अधिकमासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम
१. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.
स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥
२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
४. या महिन्यात आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा.
( उदा. एखादे फळ अथवा एखाद्य रंगाचे वस्त्र वगैरे. )
५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरुन या महिन्यास 'धोंडे महिना सुद्धा म्हणतात.)
* रोज गाईला पूरण पोळीचा घास द्यावा.
* महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
* नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
*अपूपदानाचा संकल्प -
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वं पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।
याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,
विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।
अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥
नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।
व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥
यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं ।
शंख: करतले यस्य स मे विष्णु: प्रसीदतु ॥
कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना ।
यो वंचयति भूतानि तस्मै कालात्मने नम: ॥
कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि: ।
पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम ॥
मलानांच विशुद्ध्द्यर्ह्तं तव दास्यामि भास्कर ।
इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं
* पोथीवाचन/सत्संग - अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो.
* अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो,
* अधिकमासात उपोषणाला विशेष महत्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त (दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा.)
* अयाचित (अकस्मात दुसर्‍याकडे जेवायला जाणे.)
* उपोषण - पूर्ण उपवास.
* अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा.
* महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
* महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
* महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते.
* महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते.
* अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत,
हि पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके सतराशे बहात्तर साधारण नाम संवत्सरे अधिकमासी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्षु नगरीत लिहून पूर्ण केली यात तीस अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी.

Sunday, 7 June 2015

Yummy but harmful

MSG ( मोनो सोडियम ग्लुटामेट/अजिनोमोटो) : आधुनिक अन्नातील मंद विष

सध्या मैग्गी मधे MSG आणि Lead (शीसे) जास्त प्रमाणात अढळल्या मुळे बरीच चर्चा सुरु आहे. नेमके ह्या घटकांचा शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल फार काही कुठे लिहिलेले अढळत नाही. ह्या घटकांच्या अपायकारक परिणामांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
पाकीटबंद खाद्य पदार्थ, सूप आणि चायनीज़ खाद्यांमधे MSG चा वापर केला जातो. अन्नाला झणझणीत बनवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. MSG - मोनो सोडियम ग्लुटामेट, यालाच अझीनोमोटो असे ही संबोधले जाते. वस्तुतः ग्लूटामिक एसिड हे निसर्गतः अढळणारे अमायनो एसिड आहे जे टमाटे, सोयाबीन, मशरुम मधे आढळते. ह्यावर रासायानिक प्रक्रिया करून MSG तयार केले जाते. अझीनोमोटो हे उत्तेजक रसायन आहे जे तुमच्या चेतातंतूना उत्तेजना देते ज्यामुळे बेचैन वाटने, छातीत धडधड होणे, मानसीक अवस्थेत बदल होणे यासारखी लक्षणे यायला लागतात. एलर्जी, दमा व मायग्रेन(अर्धशीर्षी) च्या रुग्णांसाठी तर हे रसायन विषासारखे आहे, हे विकार MSG च्या सेवनाने हमखास वाढतात. तोंडात आणि डोक्यात गरम वाटणे, सारखे अपचन होणे, पित्त वाढणे, डोके दुखणे, थकवा, खूप घाम येणे, मळमळ होणे अशी लक्षणे ही दिसून येतात. या सर्व लक्षणांच्या समूहाला " चायनीझ रेस्टोरेंट सिंड्रोम" असे संबोधले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की "मी चायनीझ अन्न खाल्ले तरी मला यातील कुठालीच लक्षणे दिसली नाहीत, असे का?". उत्तर फार सोपे आहे, प्रत्येक शरीराची एक सहनशीलतेची क्षमता असते, त्या क्षमतेची मर्यादा तुम्ही ओलांडली की मग लक्षणे यायला सुरु होतात. अजिनोमोटोच्या प्रत्येक सेवनानंतर हळूहळू त्याबद्धल तुमच्या शरीराची संवेदनशीलता वाढत जाते व एक दिवस लक्षणे यायला लागतात. ही लक्षणे प्रत्येकाला लवकर किंवा उशिरा नक्की येतात.
काही दशकांपूर्वी ग्लूटामेट डोळ्यांचे अजार बारे करू शकतो का हे तपासण्यासाठी उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला होता. प्रयोगाचा निष्कर्ष अश्चर्यकारक होता. ग्लूटामेट डोळे ठीक करण्याऐवजी डोळ्याच्या पेशींचा नाश करते असां निष्कर्ष समोर आला !! प्रण्यांवर केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले आहे की जास्त प्रमाणात अझीनोमोटो चे सेवन केल्यास मज्जासंस्थेचे नुकसान होते.
अजिनोमोटो च्या प्रदीर्घ वापराने तुमचे यकृत व मेंदू यावर विपरीत परिणाम होवू शकतो तसेच तुम्ही मधुमेह व उच्चरक्तदाब सारख्या अजाराना आमंत्रण देता. अजिनोमोटो तुमच्या स्वादुपिंडाला देखील उत्तेजित करते, ज्यामुळे शरीरातली साखर सामान्य असताना ही जास्त प्रमाणात इन्सुलीन उत्सर्जीत केले जाते व त्यामुळे अजून जास्त भूक लागते. अर्थातच ह्यामुळे वजन वाढते. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे अजीनोमोटोच्या सेवनाने त्याचे व्यसन लागते व परत परत खान्याची इच्छा होते.
हळू हळू अजिनोमोटो चे दुष्परिणाम सर्वाणां कळत आहेत, हे सत्य जाणून बहुराष्ट्रीय व्यापारी मंडळ अन्नपदार्थांवर यात MSG आहे हे लिहियाचे टाळत आहेत. त्या ऐवजी हाइड्रोलाइज वेजिटेबल प्रोटीन (Hydrolysed Vegetable Protein), ऑटोलायज यीस्ट (Autolysed Yeast), यीस्ट एक्सट्रेक्ट (Yeast Extract), हाइड्रोलाइस सोया एक्सट्रेक्ट (Hydrolysed Soya Extract), जेलाटीन (Gelatin), हैड्रोलयस प्रोटीन (Hydrolysed Protein) असे लिहिलेले दिसेल.
लीड (शीसे) हा एक अत्यंत घातक धातू आहे, विशेषतः मुलांमधे याचे फार गंभीर परिणाम दिसून येतात, त्यामुळे एफडीएने अन्नपदार्थात ह्या धातूच्या मिश्रणास प्रतिबंध लावला आहे. हा धातू सूक्ष्म प्रमाणात आपल्या आजुबाजूच्या वातावरणात अढळतो. औद्योगिक प्रदूषण, बंदुकीच्या गोळ्या झाडल्यानंतर होणारे प्रदूषण याद्वारे हा धातू वातावरणात मिसळतो. प्रदूषित पाण्यातून अथवा अन्न तयार करताना व्यवस्थीत स्वच्छता बाळगली नाही तर हा धातू अन्नात मिसळतो व घातक सिद्ध होतो. ह्या धातूच्या सेवनामुळे चेतासंस्थेवर, मूत्रपिंडावर व आतड्यांवर फार वाईट परिणाम होतो, त्यामुळे सतत पोटात दुखणे, चक्कर येणे, स्मृतीभंश, सतत अंग दुखत रहाणे, थकवा येणे, संडास साफ न होणे, हिरडे निळसर होत जाणे अशी लक्षणे आढळतात. या धातूमुळे लहान मुलांच्या मेंदूचे कायमचे नुकसान होवू शकते.
खरे सांगायचे म्हणजे भारतातले अन्न व औषध प्रशासनाचे नियम फारच शिथील आहेत. आपण जे पाकीटबंद खाद्यपदार्थ खाता त्याच्यावर “contains class 2 preservatives” असे लिहिलेले आढळेल, याविरुद्ध विकसित देशांमध्ये “class 1 preservatives” वापरणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरले जाणारे जे घटक असतात त्यांना प्रीझरवेटीव म्हणतात. क्लास २ प्रीझरवेटीव हे शरीरासाठी क्लास १ प्रीझरवेटीव पेक्षा जास्त हानिकारक आहेत. पण खाद्यपदार्थांची किंमत कमी ठेवण्यासाठी क्लास २ प्रीझरवेटीव वापरले जातात. त्यामुळे आता चायनीज़ अन्नावर ताव मारण्यापूर्वी वा पाकीटबंद अन्नाचे सेवन करण्यापूर्वी दहा वेळ विचार करा ....
#Forwarded

पदर

"पदर" !

काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!

किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.

लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.

जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.

मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो.  एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...

बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !

काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.

पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘

मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.

या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.

पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.

"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.

असा हा किमयागार पदर