Sunday, 7 June 2015

Yummy but harmful

MSG ( मोनो सोडियम ग्लुटामेट/अजिनोमोटो) : आधुनिक अन्नातील मंद विष

सध्या मैग्गी मधे MSG आणि Lead (शीसे) जास्त प्रमाणात अढळल्या मुळे बरीच चर्चा सुरु आहे. नेमके ह्या घटकांचा शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल फार काही कुठे लिहिलेले अढळत नाही. ह्या घटकांच्या अपायकारक परिणामांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
पाकीटबंद खाद्य पदार्थ, सूप आणि चायनीज़ खाद्यांमधे MSG चा वापर केला जातो. अन्नाला झणझणीत बनवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. MSG - मोनो सोडियम ग्लुटामेट, यालाच अझीनोमोटो असे ही संबोधले जाते. वस्तुतः ग्लूटामिक एसिड हे निसर्गतः अढळणारे अमायनो एसिड आहे जे टमाटे, सोयाबीन, मशरुम मधे आढळते. ह्यावर रासायानिक प्रक्रिया करून MSG तयार केले जाते. अझीनोमोटो हे उत्तेजक रसायन आहे जे तुमच्या चेतातंतूना उत्तेजना देते ज्यामुळे बेचैन वाटने, छातीत धडधड होणे, मानसीक अवस्थेत बदल होणे यासारखी लक्षणे यायला लागतात. एलर्जी, दमा व मायग्रेन(अर्धशीर्षी) च्या रुग्णांसाठी तर हे रसायन विषासारखे आहे, हे विकार MSG च्या सेवनाने हमखास वाढतात. तोंडात आणि डोक्यात गरम वाटणे, सारखे अपचन होणे, पित्त वाढणे, डोके दुखणे, थकवा, खूप घाम येणे, मळमळ होणे अशी लक्षणे ही दिसून येतात. या सर्व लक्षणांच्या समूहाला " चायनीझ रेस्टोरेंट सिंड्रोम" असे संबोधले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की "मी चायनीझ अन्न खाल्ले तरी मला यातील कुठालीच लक्षणे दिसली नाहीत, असे का?". उत्तर फार सोपे आहे, प्रत्येक शरीराची एक सहनशीलतेची क्षमता असते, त्या क्षमतेची मर्यादा तुम्ही ओलांडली की मग लक्षणे यायला सुरु होतात. अजिनोमोटोच्या प्रत्येक सेवनानंतर हळूहळू त्याबद्धल तुमच्या शरीराची संवेदनशीलता वाढत जाते व एक दिवस लक्षणे यायला लागतात. ही लक्षणे प्रत्येकाला लवकर किंवा उशिरा नक्की येतात.
काही दशकांपूर्वी ग्लूटामेट डोळ्यांचे अजार बारे करू शकतो का हे तपासण्यासाठी उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला होता. प्रयोगाचा निष्कर्ष अश्चर्यकारक होता. ग्लूटामेट डोळे ठीक करण्याऐवजी डोळ्याच्या पेशींचा नाश करते असां निष्कर्ष समोर आला !! प्रण्यांवर केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले आहे की जास्त प्रमाणात अझीनोमोटो चे सेवन केल्यास मज्जासंस्थेचे नुकसान होते.
अजिनोमोटो च्या प्रदीर्घ वापराने तुमचे यकृत व मेंदू यावर विपरीत परिणाम होवू शकतो तसेच तुम्ही मधुमेह व उच्चरक्तदाब सारख्या अजाराना आमंत्रण देता. अजिनोमोटो तुमच्या स्वादुपिंडाला देखील उत्तेजित करते, ज्यामुळे शरीरातली साखर सामान्य असताना ही जास्त प्रमाणात इन्सुलीन उत्सर्जीत केले जाते व त्यामुळे अजून जास्त भूक लागते. अर्थातच ह्यामुळे वजन वाढते. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे अजीनोमोटोच्या सेवनाने त्याचे व्यसन लागते व परत परत खान्याची इच्छा होते.
हळू हळू अजिनोमोटो चे दुष्परिणाम सर्वाणां कळत आहेत, हे सत्य जाणून बहुराष्ट्रीय व्यापारी मंडळ अन्नपदार्थांवर यात MSG आहे हे लिहियाचे टाळत आहेत. त्या ऐवजी हाइड्रोलाइज वेजिटेबल प्रोटीन (Hydrolysed Vegetable Protein), ऑटोलायज यीस्ट (Autolysed Yeast), यीस्ट एक्सट्रेक्ट (Yeast Extract), हाइड्रोलाइस सोया एक्सट्रेक्ट (Hydrolysed Soya Extract), जेलाटीन (Gelatin), हैड्रोलयस प्रोटीन (Hydrolysed Protein) असे लिहिलेले दिसेल.
लीड (शीसे) हा एक अत्यंत घातक धातू आहे, विशेषतः मुलांमधे याचे फार गंभीर परिणाम दिसून येतात, त्यामुळे एफडीएने अन्नपदार्थात ह्या धातूच्या मिश्रणास प्रतिबंध लावला आहे. हा धातू सूक्ष्म प्रमाणात आपल्या आजुबाजूच्या वातावरणात अढळतो. औद्योगिक प्रदूषण, बंदुकीच्या गोळ्या झाडल्यानंतर होणारे प्रदूषण याद्वारे हा धातू वातावरणात मिसळतो. प्रदूषित पाण्यातून अथवा अन्न तयार करताना व्यवस्थीत स्वच्छता बाळगली नाही तर हा धातू अन्नात मिसळतो व घातक सिद्ध होतो. ह्या धातूच्या सेवनामुळे चेतासंस्थेवर, मूत्रपिंडावर व आतड्यांवर फार वाईट परिणाम होतो, त्यामुळे सतत पोटात दुखणे, चक्कर येणे, स्मृतीभंश, सतत अंग दुखत रहाणे, थकवा येणे, संडास साफ न होणे, हिरडे निळसर होत जाणे अशी लक्षणे आढळतात. या धातूमुळे लहान मुलांच्या मेंदूचे कायमचे नुकसान होवू शकते.
खरे सांगायचे म्हणजे भारतातले अन्न व औषध प्रशासनाचे नियम फारच शिथील आहेत. आपण जे पाकीटबंद खाद्यपदार्थ खाता त्याच्यावर “contains class 2 preservatives” असे लिहिलेले आढळेल, याविरुद्ध विकसित देशांमध्ये “class 1 preservatives” वापरणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरले जाणारे जे घटक असतात त्यांना प्रीझरवेटीव म्हणतात. क्लास २ प्रीझरवेटीव हे शरीरासाठी क्लास १ प्रीझरवेटीव पेक्षा जास्त हानिकारक आहेत. पण खाद्यपदार्थांची किंमत कमी ठेवण्यासाठी क्लास २ प्रीझरवेटीव वापरले जातात. त्यामुळे आता चायनीज़ अन्नावर ताव मारण्यापूर्वी वा पाकीटबंद अन्नाचे सेवन करण्यापूर्वी दहा वेळ विचार करा ....
#Forwarded

No comments:

Post a Comment