एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न- "दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए" या वाक्याचं मराठीत भाषांतर करा.
वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे
पुढीलप्रमाणे
विद्यार्थी-१ (पुणे)-
"ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली..."
विद्यार्थी-२ (नाशिक)-
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...!"
विद्यार्थी ३ (मुंबई)-
"दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस"
विद्यार्थी-४ (अकोला) - "मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली"
विद्यार्थी-५ (अमरावती) "कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !"
विद्यार्थी-६ (यवतमाळ)-
"निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!
विद्यार्थी-७ (वाशिम)-"कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली"
विद्यार्थी-८ (बुलढाना)-
"लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..."
विद्यार्थी ९ (वर्धा) -
बाप्पा !!!
पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत"
विद्यार्थी १० (नागपूर)
"दिल ची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली"
विद्यार्थी ११ (मालवण)
मेल्या चेडया कवंडाळान काळजाचे वाटे वाटे करून फाट्यार मारून गेला मारे
No comments:
Post a Comment