Saturday, 18 April 2015

ससा आणि कासव new story

_ शर्यतीत ससा मधेच झोपुन जातो अणि शर्यत
हारतो ...

.इथपर्यंत गोष्ट तर सगळ्यान्नाच
माहिती आहे ...

पण....

पण गोष्ट इथे संपत नाही मित्रांनो..

तर पुन्हा इथून सुरु होते ती अशी..

तो हारलेला ससा पुन्हा त्या कासवाला शर्यत
लावायला सांगतो.

कासव पण फुल रुबाबात
हो म्हणतो .शर्यत सुरु होते आणि यावेळी मात्र
ससा जिंकतो ..

कारण .....

कारण आता बाजी पलटलेली असते ,
सश्याला आता समजले होते की,

या जीवनाच्या शर्यतीत नुसतं दोन पावलं टाकुन मधेच
थांबायचं नसतं तर चालतच राहावं
लागतं ...

तेव्हाच धेय्य गाठता येतं.

गोष्ट इथे अजुनही संपत नाही .

कासव मनातल्या मनात म्हणतं

""" साली किस्मत भी बड़ी कुत्ती चीज़ है ,
कभी-भी बाजी पलट देती है """
आणि यावेळी कासव सश्याला शर्यत
लावायला सांगतो

ससा हसतो आणि कासवाला सांगतो की ,
"अरे
कासवा पहिल्यावेळेस माझ्या चुकींमूळ मी शर्यत
हारलो आणि तेव्हापासून पुस्तकांपासून तर इंटरनेट
पर्यंत ..
भाया गुरुंजींपासून तर ज्ञानू मास्तर
पर्यंत सगळ्यांनी माझ्या ईज्जतीचा कचरा केला ..

आता मी परत परत नाही हरणार चल पळ इथून
फुट ....

पण काही वेळानंतर कासवाच्या खुप रिक्वेस्ट नंतर
ससा शेवटी तयार झाला.
कासव म्हटले
की
यावेळी शर्यतीचा मार्ग मी काढ़ेन

सश्याने मान्य
केले आणि शर्यत सुरु झाली .
कासव हळु हळु चालतच राहिले आणि ससा सर्रकन
जोरात पळत सुटला,

त्याचे अंतर आता थोडेसेच राहिले
होते आणि तेवढ्यात
ससा पुढे बघतो तर
काय ...

समोर एक मोठी नदी आडवी वाहत
होती ....

ससा तेथेच थांबून गेला ..

कासवही तेथे
येऊन थांबला

दोघांनी एकमेकांकडे पाहिले.

कासव म्हणाले
की मी आरामात ही शर्यत जिंकू शकतो पण मी तसे
करणार नाही.

हे बघ जेथे पाणी असेल तेथे
मी तुला पाठीवर घेइन

आणि

जेथे जमीन असेल तेथे तू
मला पाठीवर घे असे असेल तर कुणीच
आपल्याला हरवू शकणार नाही.....!

अगदी अश्याच प्रकारे मराठी माणसांनो ...

तुम्हीही एकत्र या

शिम्पी असो...

धनगर असो....

मराठा असो ....

वा माळी असो .....

फक्त एकच जात
ठेवा आणि ती म्हणजे """मराठी """असल्याची ...!

"""महाराष्ट्राचा"""असल्याची..!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्रुभूमिची ....

त्यांच्या स्वप्नांची ......

"""हिंदवी स्वराज्याची "'''"

बस्स्स्स्स्स्स्स्स्..!

No comments:

Post a Comment