Tuesday, 31 March 2015

भक्ती, पूजा करताना

सर्वांनी लक्षात ठेवावे असे. ..
◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी.
◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
◆ एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत.
◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपू नये.
◆ शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.
◆ देवापुढे श्रीफळ (नारळ) वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.
◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजू नये.
◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी, दुर्वा तोडू नयेत.
◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देवू नये.
◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे.
◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न पसरविता पंख्याने पसरावा.
◆ समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती असाव्यात, सम असू नयेत.
◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
◆ निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.
◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये. ��सर्वांना ही माहिती पाठवून द्या. ��

Marathi Poets

मराठी साहित्यातील नवरत्ने एकत्र !
न भूतो न भविष्यति !
असे छायाचित्र तुम्ही कधी पाहिले असेल असे वाटत नाही.. ना असे छायाचित्र परत कधी काढले जाईल..
मराठीतले नऊ नामवंत कवी एकाच फोटोत!..
ज्यांची नावे आपण फक्त शाळेच्या पाठ्यपुस्तकात तर कधी सुंदर काव्याच्या पुस्तकावर बघत आलो असे नऊ नामवंत कवी...

मराठी सारस्वतांचा दरबार व दरबारातील नवरत्ने : (बसलेले) संजीवनी मराठे,पद्मा गोळे,कवी यशवंत,बा.भ.बोरकर व वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज.(मागे उभे) मंगेश पाडगावकर,वसंत बापट, ग.दि.माडगूळकर, वा.रा.कांत

Monday, 30 March 2015

Account close. .. :-)

Today is
Annual Account Closing Date ....
Lets clear all our
Misunderstandings
Hurt,
Anger,
Resentment,
Guilt,
frars,
Rejections,
Failures,
Envy,
Misbehavior,
Mistakes and
all Negative Feelings

Close these Accounts

Wish you all a very
Happy, Healthy n Wealthy
New Financial Year 2015-2016...

Happy Thoughts !!

FEAR

F-E-A-R has two meanings : F- Forget
E- Everything
A- And
R- Run
OR ...
F - Face
E - Everything
A - And
R - Rise
The Choice is YOURS ...!!!

मुलांना माराव?

मुलांना मारू नका
पालक - बालक, चतुरंग
लोकसत्ता 28 मार्च 201
लेखिका - शोभा भागवत

पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा, ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’ सगळे हात वर होतात. असं विचारलं की ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’ तरी सगळे हात वर! मी आणखी एक प्रश्न विचारते, ‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’ बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही. मग विचारावं की ‘ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारते. असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं? आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’ पुन्हा एकही हात वर होत नाही. पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं. रडू येतं मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’
एकदा असं झालं की पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’ मला फार नवल वाटलं. मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का? आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’ ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले,‘ ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’ आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले. आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’ पुन्हा मोठा हशा झाला. क्वचित काही पालक भेटतात न मारणारे आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’ कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’ काही असं सांगतात की ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’
मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’ पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वडय़ाचं तेल वांग्यावर म्हणतात- तसं!’
असं आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला राग आवरत नाही तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण? एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर? तर लगेच आपण राग आवरतो.
मग एखाद्या छोटय़ा मुलीला मी माइकपाशी बोलावते. तिला विचारते, ‘‘अगदी सोप्पा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’’ ती हो म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. मग मी तिला म्हणते, ‘‘समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’’ अर्ध मिनीट ती विचार करते आणि म्हणते, ‘‘आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.’’ सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘‘छान उत्तर दिलंस. आता दुसरा सोप्पा प्रश्न. समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’’ मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो. ती म्हणते, ‘‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’’ पालक पुन्हा जोरदार हसतात. मुलीला मी शाबासकी देते. छोटं बक्षीस देते.
आपलं असं ठरलेलंच असतं की चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठय़ा माणसांना मात्र माफ! जो आपल्याला उलट मारू शकतो त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?
मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं, ‘‘आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.’’
‘‘आज आईनी मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.’’
‘‘आज दोघं मला खूप रागावले. मला असं वाटतंय की जगात माझं कुणीच नाही.’’
इतकं जर मुलांना वाईट वाटतं तर का मारायचं मुलांना? ‘छडी लागे छमछम’ वर अनेक पालकांचा विश्वास असतो. मारलं नाही तर मुलं बिघडतात अशी त्यांच्या मनात भीती असते. काही पालक तर हमखास असं सांगतात, ‘‘मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो!’’
मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.’’
पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं? कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत. सर्वाच्या तब्येती उत्तम आहेत. पशाचा काही प्रश्न नाही. घरात काही भांडण नाही अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.’’ आणि याऐवजी समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही. त्याला मार तर बसतोच वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात. हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो. अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते. आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते. आवडीच्या गोष्टी घडल्या तर पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.
तेव्हा एक लक्षात ठेवायचं, मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, ‘‘याची जरूर आहे का?’’ ९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल- ‘‘जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.’’
तेव्हा प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. खरं तर कोण समजावून सांगत बसणार? घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात. वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे. आणि मुलं इतकी चिवट असतात की ती आपला अंत पाहतात. खरंच आहे! तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत. तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.
मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल. रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा. त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा. आणि त्याला हे सांगा की आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, मला अमुक पाहिजे म्हणून आणि रडायला लागलास ते मला आवडलं नाही. किती खेळणी आहेत तुझ्याकडे! तरी हट्ट करायचा का? मूलपण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते. तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी. कधी नाही मिळालं तर नाही! हट्ट करू नये. तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला, तिला पटवून द्या. हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही. त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.
निसर्ग आपल्या हाती लहान मूल देतो. ते अननुभवी असतं, आकारानं छोटं असतं पण त्याचं आणि आपलं नातं कायम तसंच राहणार नसतं. एक वेळ अशी येणार असते की ते शरीरानं आपल्याहून ताकदवान असेल, मानसिकदृष्टय़ा आपण त्याच्यावर अवलंबून असू, कदाचित आíथक बाजूनंही आपल्याला त्याची मदत असेल अशा वेळी आपण त्याच्या लहानपणी जर आपली पालकत्वाची सत्ता अविचारानं वापरली असेल तर त्यानं कसं वागावं आपल्याशी?
पालकत्वाची सत्ता ही न वापरण्यासाठी असते. ती चांगल्यासाठी जरूर वापरावी पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये. पटतंय ना?

शोभा भागवत
चतुरंग 28.3.15

Friday, 27 March 2015

Dear Sun

42°+ temperature....

Dear Sun,
Please go to settings>display>brightness and lower your brightness! Please its too hot to handle!

Sun replied...
I have not changed any settings.
Please go to your settings and...
1. Increase number of trees...
2. Reduce carbon emissions levels...
3. Reduce concrete jungles...
4. Increase number of lakes...

Basically, switch to human mode from auto mode...!!!

Share this ������

जय श्रीराम .../\...

तुलसीदासांना ........

एकदा एका भक्तांने विचारले
की "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता..तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?"....
.
तुलसीदास म्हणाले "हो"
.
भक्त:- मला पण दर्शन घडवाल का?...
.
तुलसीदास:- "हो नक्की"
.
तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं...जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेलं...
.
.
तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्प आहे अरे तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. ". अरे प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल...
.
त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.....त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल...
.
भक्त:-"कोणते सुत्र?"
.
तुलसीदास:-
"||नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण||
||तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम||"
.
.
��वरील सुत्राप्रमाणे...

आता कोणाचेही नांव घ्या...
.
त्याची अक्षरे माेजा...
.
१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा..

२)त्यात (पंच तत्व मिलन) ५ मिळवा....

३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा..

४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा....
.
पुर्ण भाग जात नाही....
.
दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच...
ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय...
��
.
विश्वासच बसत नाही ना...
.
चला उदा. घेऊ...
गृपमधुन कोणाचेही नांव निवडा..अक्षर कितीही असोत...
.
उदा.  सुधिर
.
३ अक्षरे
.
१) ४ ने गुणा 3×४ =१२
.
२)५ मिळवा १२+५=१७
.
३) दुप्पट करा १७×२=३४
.
४)८ ने भागा ३४÷८= ४पुर्णांक ...बाकी मात्र २....
.
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे....
.
"राम"...
.
जय श्री राम...��
.
तुलसीदास जी की जय हो!!!
.
.
विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे...
.
चतुर्गुण..म्ह. ४ पुरुषार्थ..,
पंच तत्व...म्ह. पंचमहाभौतिक,
द्विगुण प्रमाण म्ह. माया व ब्रह्म असे दोन
अष्ट सो भागे म्ह. अाठ दिशांनी, आठ प्रकारची सौभाग्ये..
.
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासुन पहा....
.
विस्मयकारक वाटेल .....
पण बाकी नेहमी ...
.
२ च येईल...��...
.
तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची ओळख पटते....
.
��

जय श्रीराम .../\...

तुलसीदासांना ........

एकदा एका भक्तांने विचारले
की "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता..तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?"....
.
तुलसीदास म्हणाले "हो"
.
भक्त:- मला पण दर्शन घडवाल का?...
.
तुलसीदास:- "हो नक्की"
.
तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं...जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेलं...
.
.
तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्प आहे अरे तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. ". अरे प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल...
.
त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.....त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल...
.
भक्त:-"कोणते सुत्र?"
.
तुलसीदास:-
"||नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण||
||तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम||"
.
.
��वरील सुत्राप्रमाणे...

आता कोणाचेही नांव घ्या...
.
त्याची अक्षरे माेजा...
.
१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा..

२)त्यात (पंच तत्व मिलन) ५ मिळवा....

३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा..

४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा....
.
पुर्ण भाग जात नाही....
.
दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच...
ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय...
��
.
विश्वासच बसत नाही ना...
.
चला उदा. घेऊ...
गृपमधुन कोणाचेही नांव निवडा..अक्षर कितीही असोत...
.
उदा.  सुधिर
.
३ अक्षरे
.
१) ४ ने गुणा 3×४ =१२
.
२)५ मिळवा १२+५=१७
.
३) दुप्पट करा १७×२=३४
.
४)८ ने भागा ३४÷८= ४पुर्णांक ...बाकी मात्र २....
.
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे....
.
"राम"...
.
जय श्री राम...��
.
तुलसीदास जी की जय हो!!!
.
.
विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे...
.
चतुर्गुण..म्ह. ४ पुरुषार्थ..,
पंच तत्व...म्ह. पंचमहाभौतिक,
द्विगुण प्रमाण म्ह. माया व ब्रह्म असे दोन
अष्ट सो भागे म्ह. अाठ दिशांनी, आठ प्रकारची सौभाग्ये..
.
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासुन पहा....
.
विस्मयकारक वाटेल .....
पण बाकी नेहमी ...
.
२ च येईल...��...
.
तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची ओळख पटते....
.
��

Thursday, 26 March 2015

Alphabetical acrostic

Alphabets are so intelligently arranged, they show you the way to live life
��������������
"A"lways
"B"e
"C"areful.
��������������
"D"on't have
"E"go with
"F"riends n Family.
��������������
"G"ive up
"H"urting
"I"ndividuals.
��������������
"J"ust
"K"eep
"L"oving
"M"ankind.
��������������
"N"ever
"O"mit
"P"rayers.
����������������
"Q"uietly
"R"emember God.
����������������
"S"peak
"T"ruth.
����������������
"U"se
"V"alid
"W"ords.
����������������
"X"press
"Y"our
"Z"eal......!!!!!
����������������
Have a great life...

Singapore

६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural  resources  नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.

ज्या दिवशी Singapore हे Malaysia  पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढासा ढासा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore  चा असा काही कायापालट केला कि आज Singapore  हे Asia  मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना  VISA-Free एन्ट्री आहे! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.

वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे  निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.

बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.

माहिती म्हणून Share करतोय.

Just Remember -Poem

"एवढे लक्षात ठेवा"
- विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

What's the score?

स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करुन काय
इचारतो मला.....???
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला.....।।

युवराजच्या फटक्याला
वाजवतो टाळ्या
अन सचिन च्या शतकाला
फटाक्यांच्या माळा...
प्यान्ट फाटली ढुंगनावर
ठिगाळ नाय त्याला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

एका एका जाहिरातीचे
करोडो घेती
तोंड रंगवुन येती
कधी तोंड रंगवुन जाती..
टीवी च्या चैनल वर
सचिन पुन्हा येतो
चुना लावून येतो कधी
चुना लावून जातो..
बूस्ट घ्या बिअर घ्या
दूध मागु नका
पेप्सी घ्या कोला घ्या
पाणी मागु नका...
पिज्जा घ्या बर्गर घ्या
भाकर मागु नका...
थोबाड त्यांच बघुन
फायदा काय तुला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला..??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

आय पी एल नावाच
आणले नव सॉन्ग
खेळाडूंची झाली विक्री
लाउनि रांग...
काळा पैसा पांढरा करतो
आय पी एल वाला
न अर्थकरण कळणार कधी
आपल्या देशाला...
खेळ कुठे राहिला सारा
बाजार झाला
नी क्रिकेट नावाचा
आजार झाला
या आजारान घेरलया
उभ्या देशाला
अन तोंड वर करुन काय
इचरतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

मीच आता काही
विचारतो तुला
खरे खरे सांगायचे
स्कोर काय झाला...

बलात्कार झाले कितीे
स्कोर काय झाला...
दंगली मधे मेले कितीे
स्कोर काय झाला...
कामगारांना पिळले कितीे
स्कोर काय झाला...
दलिताना छळले कितीे
स्कोर काय झाला...
बेकारांची गर्दी कितीे
स्कोर काय झाला...
शेतकरी मेली कितीे
स्कोर काय झाला...
स्विस बैंकेत पैसा का
स्कोर काय झाला...
गरिबाना मारले का
स्कोर काय झाला...
बालगुन्हे वाढले कितीे
स्कोर काय झाला...
जंगल जमीन हडपलीे
स्कोर काय झाला...
उभा देश जळतोया
जाण नाही तुला
न तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला...
सांगा स्कोर काय झाला
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...
शीतल साठे..

Wednesday, 25 March 2015

Jokes

बॉस :- तूला आज रात्रीपर्यँत थांबून फाईल
पुर्ण करावी लागेल.
ज्युनियर :- माफ करा सर, पण
मला नाही जमणार !
बॉस :- का नाही जमणार ?
ज्युनियर :- माझ्या धंद्याची वेळ होते.
बॉस :- म्हणजे ?
ज्युनिअर :- रात्री मी रिक्षा चालवतो फक्त
कंपनीच्या पगारात घर थोडीच चालतंय..?

.
.
.
.
.
.
बॉस :-बस कर यार,
आता काय रडवणार का मला?
कधीतरी ये
रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन

माझ्या पावभाजीच्या गाडीवर....

Ayushyat Teen Goshti kadhich visru Naka....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.






































1-Lakud todyachi
2-Topivalyachi
3-Sasa ani Kaswachi

ज्या  मुली  स्व:ताला  म्हणतात  की...
''माझ्या  मागे  खुप  मुले  फिरतात''
:
: त्यांनी  लक्षात  घ्यायला  पाहिजे,
की  कमी  किमतीच्या वस्तुनकडे   जास्त    custemer  आकर्षित  होत  आसतात....
:
:
:
:  हा   ECONOMICS   चा  नियम  आहे.

Friday, 20 March 2015

चवदार तळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र
प्रयत्न केले.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी
चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले...
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे...

" हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर
समाजात सर्वच माणसे सारखीच.
अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला..?

हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे.
चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही...

आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो
तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो.
चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे
पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही.
तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील
माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताच त्या तळ्यावर
आपणास जावयाचे आहे. ”

असे अंगावर शहारे आणणारे उद्गार,
मानवतेचे कैवारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या
ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले...

ठरल्या प्रमाणे वरील सगळी मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कुच करतात.
त्यांच्या मागुन अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही
तळ्याच्या काठावर येतो.

बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी
ओंजळीत धरतात.
तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन
त्यांचे डोळे पाणावतात.

" हे पाणी, जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजरांना
व गुरा ढोरांना उघड आहे.
पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श
एवढे वर्ष वर्ज्य होता.

मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही
तर हे प्राशन करतो..."

म्हणुन त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले.
अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे
आजपासुन खुले आहे,
तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावे.
असे जाहिर करताच...

लोकांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली,
अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले...
हा दिवस त्यांच्यासाठी खरा-खुरा
सोन्याचा दिवस होता...

तो दिवस म्हणजे २० मार्च १९२७.

जगातील एकमेव महापुरुष...
ज्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह करून
त्या जातीयतेच्या दगडी व्यवस्थेला समतेचा एक जीवंत संदेश दिला...

अशा महामानवास आज चवदार तळे क्रांतीदिनी...

कोटी कोटी अभिवादन...