६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.
ज्या दिवशी Singapore हे Malaysia पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढासा ढासा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore चा असा काही कायापालट केला कि आज Singapore हे Asia मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना VISA-Free एन्ट्री आहे! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.
वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.
बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.
माहिती म्हणून Share करतोय.
No comments:
Post a Comment