डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र 
प्रयत्न केले. 
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी
चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले... 
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे...
" हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर
समाजात सर्वच माणसे सारखीच. 
अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला..?
हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. 
चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही... 
आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो 
तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. 
चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे 
पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही.
तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील
माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताच त्या तळ्यावर
आपणास जावयाचे आहे. ”
असे अंगावर शहारे आणणारे उद्गार, 
मानवतेचे कैवारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या 
ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले...
ठरल्या प्रमाणे वरील सगळी मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कुच करतात. 
त्यांच्या मागुन अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही
तळ्याच्या काठावर येतो.
बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी 
ओंजळीत धरतात. 
तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन
त्यांचे डोळे पाणावतात. 
" हे पाणी, जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजरांना
व गुरा ढोरांना उघड आहे.
पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श 
एवढे वर्ष वर्ज्य होता.
मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही 
तर हे प्राशन करतो..."
म्हणुन त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले. 
अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे 
आजपासुन खुले आहे, 
तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावे.
असे जाहिर करताच...
लोकांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली,
अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले...
हा दिवस त्यांच्यासाठी खरा-खुरा 
सोन्याचा दिवस होता...
तो दिवस म्हणजे २० मार्च १९२७.
जगातील एकमेव महापुरुष...
ज्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह करून 
त्या जातीयतेच्या दगडी व्यवस्थेला समतेचा एक जीवंत संदेश दिला...
अशा महामानवास आज चवदार तळे क्रांतीदिनी...
कोटी कोटी अभिवादन...
 
No comments:
Post a Comment