दिवस तुझे हे फ़ुगायचे…..
दिवस तुझे हे फ़ुगायचे
मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥
लाडकी माझी तु राणी
नको तु खाऊ गं लोणी
पाण्यात लिंबाला पिळायचे॥१॥
साजुक तुपाची धार
वाढवी calories फ़ार
पोटात salad भरायचे॥२॥
प्रभाती फिराया जाणे
वाटेत धाप लागणे
दमुन जरासे टेकायचे॥३॥
वजन वाढते फ़ार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे॥४॥
आपुल्या घरच्यापाशी फिर तु गडे जराशी
हालत चालत राहायचे॥५॥
No comments:
Post a Comment