साबणाचे पत्र -
प्रिय निरमा ताईस 
सप्रेम नमस्कार
विनंती विशेष,
पत्र लिहिण्यास कारण 
कि बरेच दिवस झाले 
तुझे पत्र नाही,
इकडे लाईफबॉय लंडनहून 
परत आला आहे. त्याने 
स्वतः चे नांव बदलून 
लाईफबॉय प्लस केल्याने
सनलाईट आणि त्याचे 
भांडण झाले आहे... 
भांडण सोडवण्यासाठी 
फेयरग्लोव मध्ये पडला, 
त्यामुळे त्यालाही मार पडला.. 
त्याला लगेचच डॉक्टर डेटोलकडे
नेण्यात आले..
आनंदाची बातमी म्हणजे
लक्स आणि पीयर्सचे लग्न
ठरले आहे..
हमाम काका आणि गोदरेज काका
लग्नाची तयारी करत आहे ..
आणखी एक आनंदाची बातमी
म्हणजे रेक्सोना वाहिनीला 
जुळ्या मुली झाल्या आहेत,
एकीचे नांव कॅमे क्लासिक 
तर दुसरीचे कॅमे नॅचरल 
ठेवण्यात आले आहे...
संतूरलाही मुलगा झाला..
पामोलिव्ह मामांची तब्येत
मध्यंतरी बरी नव्हती..
तसेच मोती काकांच्या 
मुलाचे लग्न शिकेकाई शी 
झाले..
लग्न समारंभाला सर्व 
साबण परिवार उपस्थित होता…
ससा भटजींनीच लग्न लावले ..
व्हील बाईंनी कपड्यांची 
व्यवस्था केली, मेडीमिक्स ने
सर्वांना वाढले तर विमबार ने 
भांडी घासली ..
पाँड्सआणि जॉन्सन आता 
शाळेत जाऊ लागले आहेत.. 
सर्फ मावशीची तब्येत कशी 
आहे ,पत्र लिहून कळवणे ..
तुझा,
सिंथोल.
 
No comments:
Post a Comment