मसालेदार पत्र
मु.पो. वैतागवाड़ी
ता:- ताकनपळशी
जि:- शोधणारा आळशी
प्रिय ,
दालचीनीताई,जायफळदादांना सास्टंग नमस्कार,
पत्र लिहिण्याचे कारण असे की, काजूदादा सूक्रूप आहेत.,आनंदाची खुशखबर अशी की,जीरेकाकांची सुकन्या कुमारी "मिरी" हिचे विवाह कुमार "लवंग" यांच्याशी ठरलेले आहे.
बदाम आणि पिस्ता यांची तब्यत ठीक आहे .
मोरिला अजुन शाळेत घातले नाही......
कडीपत्ता अजुन लहान आहे......आणि
दूसरी गोष्ट म्हणजे चहापत्ती आणि साखर यांच्या विवाहाला नकार दिल्याने त्या दोघांनी उकळत्या पाण्यात उडी टाकून जीव दिला..
तसेच,बटाटेमामा कालच सुरीवर स्वार करुण मरण पावले........तेव्हापासून कांदेमामी रडत आहे.......आणि दुसऱ्यांना पण रडवत आहे.........
पत्ता :- अलबत्ता-खलबत्ता-बेपत्ता
ता :- अलीकडे
जि :- पलिकडे
राहणारा सगळीकडे
No comments:
Post a Comment