वेंगुर्ले ! अगदी पाहताक्षणी प्रेमात पडावं असे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दक्षिणेकडचा आणि रूपेरी सागर किनार्यांची
शाल पांघरलेला छोटासा निसर्गरम्य तालुका म्हणजे वेंगुर्ले. आणि वेंगुर्ले शहर हे त्यांचे तालुक्याचे ठिकाण. इथली
सौंदर्यस्थळं किती सांगावीत? भल्याभल्यांना मोहात पाडणारा बंदरावरचा बांधकामखात्याचा सागरबंगला, त्याच्या
मागच्या डोंगरावरचे दीपगृह, नगरपरिषदेचं मार्केट, बस स्टॅण्ड जवळचं मानसीश्चराचं देवस्थान, दाभोलीकडे जातानाचा
छोटासा घाट, नारायणतलाव, सागरेश्चराचा रम्य किनारा, भरगच्च बाजारपेठ आणि खवय्यांची रसना तृप्त करणार्या
अस्सल मालवणी खानावळी ही यादी आहे न संपणारी!
वेंगुर्ले शहर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळं दिसतं. दाभोली घाटीच्या माथ्यावरून पाहिलं तर उठून दिसतो
सागरबंगला आणि सागरेश्चराचीपुळण, सागरेश्चर ते बंदर हा किनारा अर्धचंद्नाकृती आहे. या घाटीतून वेंगुर्ले अगदी
निरागसबाळासारखं दिसतं. सागरेश्चराच्या किनार्यावरून दिसणारं वेंगुर्ले अगदी टुमदार, झाडामाडांत लपलेलं अस
दिसतं. वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेतून फेरफटका मारताना तर वेळ कसा गेला हेच कळत नाही. कोकमाची सोलं, ,
काजूगर, अंगठ्याएवढी पातळसालीची गोड सोनयाळ केळी, गावठीतांदूळ, गावठी अंडी, तर्हे्तर्हेची
सुवासिक फुले. आणि खराखुरा कोकणी मेवा खरेदी करावा तर तो वेंगुर्लातून ......
Sunday, 22 February 2015
Vengurla
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment