Tuesday 10 February 2015

Manache Shlok

श्री गणेशाय नम:!!
सुमंगल ! सुप्रभात ! ‘

मनाचे श्लोक !!! --एक-अभ्यास -
जय जय रघुवीर समर्थ  (  फेब्रुवारी १० )

भवाच्या भये काय भीतोस लंडी
धरी रे मना धीर धाकासि सांडी
रघूनायकासारिखा स्वामि शीरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी      ॥२७॥
 

सरळ अर्थ: मना, अरे या संसाराच्या, जन्ममरणाच्या फेर्‍याला तू घाबरतोस का असा भेकडासारखा? धीर धर आणि हा मरणाचा धाक सोडून दे. अरे ज्याला कोपिष्ट दंडधारी यमाबद्दल जाणीव आहे आणि जो त्या यमराजाची उपेक्षा करीत नाही असा हा रघुवंशाचा नायक असलेला रामासारखा अधिकारी पुरुष तुझ्या मस्तकावर वरदहस्त धरून आहे.

विश्लेषण: मागील श्लोक, हा श्लोक आणि पुढला श्लोक असे तिन्ही एकत्रितपणे वाचले तर अर्थ स्पष्ट होतो. समर्थ म्हणतात, हे मना, भवाची म्हणजे जन्म, आयुष्य, संसार, मरण यांची सगळ्याची चिंता करणे थांबवायचे न सोडता भवसागराची तू एकाद्या भेकड माणसासारखी भीती का घेतो आहेस? भव हा तर सर्वांच्या नशिबी लिहिलेला आहे. कुणाला चुकलेला नाही. मग जे होणे अनिवार्य आहे, त्याची भीती कशासाठी बाळगायची? तेव्हा तू धीर धर आणि हा जो मरणाचा, यमराजाचा धाक तुला बसलेला आहे तो सोडून दे. अरे, ज्याला क्रोधाविष्ट, दंडधारी यमराजाच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच त्याची उपेक्षा जो करत नाही असा रघुकुलाचा नायक प्रत्यक्ष श्रीराम तुझा पाठीराखा, स्वामी आहे. मग तू भीति, धाक का बाळगावा?
��
(क्रमश :)
शब्दांकन : मुकुंद कर्णिक 
संकलन :��

No comments:

Post a Comment