Forwaded msg
ते आणि मी...
प्रथम ते गांधींसाठी आले.
त्यांचा खून केला.
मी शांत राहिलो.
कारण मी काही गांधीवादी नव्हतो.
नंतर ते डॉक्टर दत्ता सामंत यांच्यासाठी आले.
त्यांचा खून केला.
मी शांत राहिलो.
कारण मी काही कामगार नव्हतो.
नंतर ते डॉक्टर दाभोलकर यांच्यासाठी आले.
त्यांचा खून केला.
मी शांत राहिलो.
कारण मी काही अनिस कार्यकर्ता नव्हतो.
काल ते कॉम्रेड पानसरे यांच्यासाठीआले.
त्यांच्यावर हल्ला केला.
मी शांत राहिलो.
कारण मी काही कम्युनिस्ट नव्हतो.
उद्या ते माझ्यासाठी येतील.
माझ्यावर हल्ला करतील.
मी मदतीसाठी सभोवार पाहीन.
सगळे शांत राहतील.
कारण .....?
No comments:
Post a Comment